Chandrapur Employee Death | प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात बुडून तळोधीच्या ग्रा.पं कर्मचाऱ्याचा मृत्यू; ४८ तासांनंतर आढळला मृतदेह

पवित्र स्नानासाठी गेले असताना काळाचा घाला; एनडीआरएफच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती
Chandrapur Employee Drowning Prayagraj
डामाजी महादेव पाकमोडेPudhari
Published on: 
Updated on: 

Chandrapur Employee Drowning Prayagraj

चंद्रपूर :  उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलेल्या नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक डामाजी महादेव पाकमोडे (वय ४५) यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

१६ नोव्हेंबर रोजी सकाळी नावेतून उतरत असताना ते पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. तब्बल ४८ तासांच्या शोधमोहिमेनंतर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घटनास्थळापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. या घटनेने तळोधी (बा.) परिसरात शोककळा पसरली आहे.

Chandrapur Employee Drowning Prayagraj
Chandrapur News | उन्हाळी धान लागवडीला परवानगी द्या; ब्रह्मपुरीतील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

डामाजी पाकमोडे हे देवदर्शन आणि पवित्र स्नानासाठी कुटुंबीयांसह प्रयागराज येथे गेले होते. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता त्रिवेणी संगमावर नावेतून उतरत असताना त्यांचा तोल जाऊन ते नदीच्या पाण्यात बुडाले. घटनेनंतर ते बेपत्ता झाल्याने स्थानिक पोलीस, जल पोलीस, एनडीआरएफचे पथक आणि गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सलग दोन दिवस शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर बुधवारी (दि. १८) सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पार्थिव घेऊन नातेवाईक तळोधी (बा.) गावाकडे रवाना झाले.डामाजी पाकमोडे यांचे पार्थिवावर गुरूवारी (दि. १९) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते तळोधी ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक म्हणून कार्यरत होते. मनमिळाऊ, सुस्वभावी आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची गावात ओळख होती.

Chandrapur Employee Drowning Prayagraj
Chandrapur News | गोंडपिपरीत ओव्हरलोड वाहतूक; खड्डेमय रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सहा विवाहित बहिणी, भाचे व भाऊजी असा मोठा आप्तपरिवार आहे. आनंदाने देवदर्शनासाठी गेलेल्या पाकमोडे कुटुंबावर या दुर्दैवी घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.