Sudhir Mungantiwar Viral Phone Call | भाजपला संपवायला निघाले का?’ मुनगंटीवारांचा पोलिसांशी मोबाईलवरील संवाद व्हायरल

गोंडपिपरीतील एमआयडीसी जमीन मोजणीवरून संतप्त; ‘शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी कशी करता?
Sudhir Mungantiwar Viral Phone Call
Sudhir Mungantiwar Viral Phone Call Pudhari
Published on: 
Updated on: 

Gondpipri MIDC Land Measurement Issuse

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासनातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. १२ गावांतील शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध असतानाही प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. चेकबोरगाव आणि धानापूर परिसरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत विरोध दर्शविला.

धानापूर येथील शेतकरी बालू बोनगिरवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून या परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मुनगंटीवार यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस शिपायाशीही संवाद साधला. शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी कशी करता? भाजपला संपवायला निघाले का? असा संतप्त सवाल त्यांनी पोलिसांना केला.

Sudhir Mungantiwar Viral Phone Call
FDA Action Chandrapur | शाकाहारी,मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी एकाच तंदूरचा वापर; चंद्रपुरातील चार हॉटेलचे परवाने निलंबित

मुनगंटीवार आणि पोलिस शिपायामधील मोबाईलवरील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना जमीन मोजणी होऊ देणार नाही, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी स्पष्ट केली. तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

या जमीन मोजणीच्या प्रश्नावर उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून २२ नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात भेट घेणार असून, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

गोंडपिपरीतील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पावरून शेतकरी आणि प्रशासनातील संघर्षाला आता राजकीय वळण मिळाले आहे. जमीन मोजणीच्या मुद्द्यावरून आगामी काळात परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.