

चंद्रपूर : राजुरा येथील डब्ल्यूसीएल सास्ती ओपन कास्ट परिसरात असलेल्या 66 केव्ही सबस्टेशनमध्ये काही अज्ञात इसमांनी तलवारीच्या धाकावर ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना 30 एप्रिल च्या पहाटेस घडली. या प्रकरणामध्ये डिबी पथकाने तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेची तक्रार सहायक प्रबंधक वीरेंद्र गुरुवार अधिक प्रसाद शर्मा (वय ३८), यांनी राजुरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी 30 एप्रिलच्या पहाटेस तलवारीच्या धाकावर 66 केव्ही उपविभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना धाक दिला. त्यामुळे कर्मचारी एकाच ठिकाणी बसून राहिले. त्यानंतर 80 हजार रूपये किंमतीचा 66 केव्ही उपविभागातील मुद्देमाल घेऊन पसार झाले. यावेळी चोरट्याने तिथे असलेले सीसीटीव्ही चे वायरही तोडले. सर्व आरोपी तोंडावर मास्क बांधून होते. या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३१०(२) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
याप्रकरणी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. डिबी पथकाने या प्रकरणामध्ये तिघांना संशयीतांना अटक केली आहे. चिमनी उर्फ तन्मय मुनिलभोय (वय २२), मंगु उर्फ मंगेश भाउगळी ठाकरे (वय २४),पापडी उर्फ व्यंकटेश मोमला मालोद (वय १८) सर्व रा. बल्लारशा असे संशयीत आरोपींचे नाव आहे.