गोंदिया : अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

अर्जुनी-मोरगाव-साकोली मार्गावरील घटना
Bear killed in collision with unknown vehicle
अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू Pudhari Photo
Published on
Updated on

अर्जुनी मोरगाव ते साकोली मार्गावर निमगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.11) सकाळच्या सुमारास घडली. सदर मृत अस्वल मादा असून अंदाजे 5 वर्षाचे आहे. रविवारी सकाळी रस्त्याच्या कडेवर अस्वल मृतावस्थेत पडून असल्याचे नागरिकांना दिसून आले. याची माहिती निमगाव येथील नागरिकांनी अर्जुनी मोरगाववन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी अधिकारी सचिन कटरे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पाहणी केली.

भंडारा : तीन वाघाचे बछडे, एका अस्वलाचा मृत्यू

सदर अस्वलाचे वय अंदाजे 5 वर्षे असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पहाटे 4 ते 5 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यु झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत अस्वलाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी एस. जी. अवगान यांच्या समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. समीर शेंदरे यांनी उत्तरीय तपासणी केली. यावेळी मृत अस्वलाचे नमुने पुढील तपासाकरीता घेण्यात आले आहेत. शवविच्छेदन झाल्यावर अस्वलावर अर्जुनी मोरगाव येथील वन आगारात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अस्वलच्या मृत्यूप्रकरणी संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आकस्मित मृत्युची नोंद करून गुन्हा नोंद केला आहे, पुढील तपास वन परिक्षेत्राधिकारी सचिन कटरे करीत आहेत.

Bear killed in collision with unknown vehicle
सातारा : परळी खोऱ्यातील सांडवली येथे अस्वलाचा हल्ला, वृद्ध गंभीर जखमी

महिनाभरातील दुसरी घटना...

अर्जुनी-मोरगाव ते साकोली मार्ग नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागलेला असून या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे अनेकदा अपघातात वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. विशेष म्हणजे, यापूर्वी गेल्या महिन्यात 18 जुलै रोजी नवेगावबांध परिसरात रेल्वेगाडीच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यात आता महिनाभरातच हि दुसरी घटना घडून आणखी एका अस्वलाचा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news