Chandrapur Police | चंद्रपूर पोलिसांचा डंका : पोलीस क्रीडा स्पर्धेत सलग ११ वेळा 'जनरल चॅम्पियन'

भंडाऱ्यात पार पडलेल्या स्पर्धेत ८४० खेळाडूंमध्ये चंद्रपूरचे वर्चस्व
General Champion Chandrapur Police
General Champion Chandrapur PolicePudhari
Published on
Updated on

General Champion Chandrapur Police

चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यात पार पडलेल्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा–२०२५ मध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाने पुन्हा एकदा आपली मजबूत छाप उमटवत सलग ११ व्या वर्षी 'जनरल चॅम्पियनशिप' पटकावली. ५ ते ९ डिसेंबरदरम्यान झालेल्या या भव्य स्पर्धेत विविध विभागांतून ८४० पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

भंडारा जिल्हा पोलीस मैदानावर ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा–२०२५ उत्साहात पार पडली. नागपूर (ग्रामीण), भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील प्रत्येकी १४० असे एकूण ८४० खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी हजेरी लावली होती.

General Champion Chandrapur Police
Chandrapur Crime | चंद्रपूर हादरले : अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, बाथरुममध्ये जाऊन करायला लावायचा व्हिडिओ कॉल

या स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाने नेत्रदीपक खेळ कौशल्य दाखवत सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि खो-खो यामध्ये प्रथम व द्वितीय अशी उल्लेखनीय विजेतेपदे पटकावली. तर वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती, ओशो-तायकोंडो आणि पॉवरलिफ्टिंग—यातही चंद्रपूरच्या खेळाडूंनी बहुमोल पदके जिंकत एकूण गुणतालिकेत आघाडी साधली.

परिणामी, "जनरल चॅम्पियनशिप २०२५" चा मानकरी म्हणून चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाचा गौरव करण्यात आला. २०१६ पासून सलग उत्कृष्ट प्रदर्शन करत चंद्रपूर पोलिसांनी २०२५ मध्ये ११ व्या वेळेस परिक्षेत्रीय स्पर्धेचे विजेतेपद कायम राखून जिल्ह्याचे नावलौकिक वाढवला आहे.

General Champion Chandrapur Police
Chandrapur Tiger Attack |बछडा गमावल्याने वाघीण आक्रमक : चंद्रपूर मुल मार्गावरील केसला घाटात दुचाकीस्वारांवर झडप

समारोप समारंभाला विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  हर्ष पोद्दार, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जनरल चॅम्पियनशिपची घोषणा होताच मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उपस्थितांनी चंद्रपूर पोलिसांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news