Chandrapur Crime | चंद्रपूर हादरले : अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, बाथरुममध्ये जाऊन करायला लावायचा व्हिडिओ कॉल

शिक्षक दिलीप मडावी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक
Chandrapur Minor girl assault case
Chandrapur Minor girl assault case (Pudhari Photo)
Published on
Updated on

Chandrapur Minor girl assault case

चंद्रपूर : नाशिकमधील मालेगाव येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपुरातही एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दिलीप दादाजी मडावी (वय ५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली.

Chandrapur Minor girl assault case
Chandrapur Municipal Elections | चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात

दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे. तेव्हा शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. २० तारखेला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप मडावी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत.

...असे आले प्रकरण उघडकीस

नराधम शिक्षक पीडित मुलीला रात्री बाथरुममध्ये जाऊन विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करायला सांगायचा. या कॉलचे त्याने स्क्रिनशॉटसुद्धा काढले होते. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकीने हा स्क्रिनशॉट व चॅटिंग पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर जाताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली, तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

Chandrapur Minor girl assault case
Chandrapur Crime | चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई: बल्लारपूरच्या कुख्यात टोळीतील १० सराईतांवर 'मोक्का'

घुग्घुस केंद्रातही तक्रार

दिलीप मडावी याची मागील काही दिवसांपूर्वी घुग्घुस केंद्रातील एका शाळेत बदली झाली. येथेही त्याने मुलींना बॅडटच केल्याच्या तक्रारी पालकांकडे गेल्या. त्यांनी शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले. पोलिस ठाण्यापर्यंतही विषय गेला होता. मात्र, तक्रार झाली नसल्याची माहिती आहे. शेवटी पालकांनी त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news