Chandrapur Crime | OYO ब्रॅण्ड व लोगोचा गैरवापर करून व्यवसाय करणाऱ्या 15 हॉटेल, लॉजेसवर गुन्हा दाखल

चंद्रपूर शहर पोलीसांची धडक कारवाई : कोणताही व्यावसायिक करार नसतानाही OYO च्या लोगोचा वापर
Chandrapur Crime
OYO ब्रॅण्ड व लोगोचा गैरवापर करून व्यवसाय करणाऱ्या 15 हॉटेल, लॉजेसवर गुन्हा दाखल File photo
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील हॉटेल व लॉजेसकडून OYO कंपनीच्या ट्रेडमार्क व लोगोचा बनावट वापर करून व्यवसाय सुरू असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर, चंद्रपूर शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत 15 हॉटेल,लॉजेसविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक १८ जुलै २०२५ रोजी OYO कंपनीचे नोडल अधिकारी श्री मनोज माणिक पाटील (अहमदाबाद) यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे लेखी तक्रार दाखल करत माहिती दिली की, OYO Hotel & Homes Pvt. Ltd. ही कंपनी भारतातील कंपनी अधिनियम २०१३ नुसार नोंदणीकृत असून, OYO ROOMS हा ट्रेडमार्क ट्रेडमार्क अधिनियम १९९९ अंतर्गत नोंदणीकृत आहे.

Chandrapur Crime
Chandrapur Crime | चंद्रपूर हादरलं: मुलाने कुऱ्हाडीने वडिलांचा केला निर्घृण खून!

तक्रारीनुसार, चंद्रपूर शहरात अनेक हॉटेल/लॉजेस OYO कंपनीशी कोणताही व्यावसायिक करार नसतानाही OYO चा ब्रॅण्ड, लोगो, डिझाईन घटक व दर्शनी लुकचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. हे OYO च्या बौद्धिक संपदेचे उल्लंघन असून कंपनीच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचवणारे असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

तक्रारीत नमूद 15 हॉटेल/लॉजेस पुढीलप्रमाणे

1. Hotel Royal Inn – Ballarpur Road

2. Hotel Dream Stay – Ashtabhuja

3. Hotel Friends Stay – Ballarpur Road

4. Leo Star Hotel – Ashtabhuja Ward

5. Hotel RR Inn – Babupeth

6. Hotel Sky Line – Ashtabhuja Ward

7. Hotel Ashoka Lodging & Boarding – Babupeth

8. Hotel IK Residency – Vikas Nagar

9. Hotel 3 Star – Babupeth

10. Hotel Celebrity – Babupeth

11. Hotel Green Park – Babupeth

12. Hotel 7 Day – Mahakali Mandir Road

13. Hotel Sunrise – Jatpura Gate

14. Rayan Hotel & Celebration – Vichoda

15. Hotel Flagship Inn – Near Janta College

वरील हॉटेल्सनी OYO ब्रँडचा खोटा वापर केल्याने भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३४५(३), ३४७(१) आणि ट्रेड मार्क अधिनियम १९९९ चे कलम १०३ व १०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrapur Crime
Chandrapur Crime | तोतया पोलिसांचे भरारी पथक वसूल करत होते खंडणी : मूल पोलिसांनी केला पर्दाफाश

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री निशीकांत रामटेके (पो.स्टे. चंद्रपूर शहर) यांच्या नेतृत्वात पार पडली. गुन्हा दाखल केल्यानंतर, ७ ते ८ हॉटेल्सवर मध्यरात्रीपर्यंत धाडी टाकून तपासणी व कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेरील संबंधित लॉजेसवरही तपास सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईचा उद्देश ग्राहकांची फसवणूक रोखणे, OYO कंपनीचे बौद्धिक संपदा हक्क वाचवणे आणि अवैध व्यवसाय पद्धतीवर अंकुश ठेवणे हा आहे. गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून, लवकरच आणखी काही हॉटेल्सवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news