Chandrapur Mayor Election | चंद्रपूर महापालिकेत सत्ता समीकरणांना नवा ट्विस्ट; ठाकरे सेनेकडून १० नगरसेवकांची जुळवाजुळव

Chandrapur Politics | प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात भेट; उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेण्याची तयारी
Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation Politics

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आणखी एक नवे वळण मिळाले असून, ठाकरे गटाच्या शिवसेनेने (उबाठा) निर्णायक हालचाली करत दहा नगरसेवक आपल्या बाजूने जमवले आहेत. यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांची गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत एकूण आठ नगरसेवक निवडून आणले होते. यामध्ये शिवसेनेचे सहा आणि वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवकांचा समावेश आहे. या आठ नगरसेवकांच्या अधिकृत गटाने आता काँग्रेसच्या दोन बंडखोर नगरसेवकांना आपल्या गटात सामील करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडे आता एकूण दहा नगरसेवकांची ताकद तयार झाली आहे.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Mayor Election: चंद्रपूर महापौर, काँग्रेस गटनेतेपदाचा वाद शमला मात्र फोडाफोडीने निवडणुकीत नवा पेच

या दहा नगरसेवकांसह ठाकरे सेनेचे नेते अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचे समजते. या भेटीत चंद्रपूर मनपातील सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर हे सर्व नगरसेवक मुंबई येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, ठाकरे सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदावर ठाम दावा ठोकल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. महापौर पदासाठी शिवसेनेचा आग्रह कायम असल्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Accident | चंद्रपूर - गडचिरोली महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांची वडेट्टीवारांनी घेतली भेट

एकीकडे काँग्रेस पक्ष अंतर्गत गटबाजीने त्रस्त असताना, दुसरीकडे भाजप बहुमतासाठी आवश्यक संख्येपासून दूर आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची ही दहा नगरसेवकांची ताकद सत्तास्थापनेत निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चंद्रपूर मनपातील सत्तासंघर्ष आता केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता राज्यस्तरीय नेत्यांच्या भेटीगाठीपर्यंत पोहोचला असून, आगामी काही दिवसांत होणाऱ्या निर्णयांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news