Chandrapur Roshan Kule | किडनी विक्री करणाऱ्या रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीचा ५ लाखांचा धनादेश

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते मदतीचे वितरण; संकटातून उभारी देणारा शासनाचा आधार
 Roshan Kule kidney case
रोशन कुळे यांना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आलाPudhari
Published on
Updated on

Roshan Kule kidney case

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मंगळवारी (दि.१९) चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सावकारीच्या विळख्यात अडकून किडनी विक्रीसारख्या अत्यंत वेदनादायी परिस्थितीला सामोरे जावे लागलेल्या रोशन कुळे आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा क्षण दिलासादायक आणि नव्या आशेचा ठरला.

माणुसकीचा आधार देणारी मदत

राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात रोशन कुळे यांनी सावकारी जाचामुळे किडनी विकावी लागल्याचा गंभीर आरोप केला होता. या घटनेनंतर शासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर केली होती. आज त्या मदतीचा धनादेश अधिकृतरित्या वितरित करण्यात आला.

ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, संकटाच्या अंधारात शासनाने दिलेला माणुसकीचा हात असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

 Roshan Kule kidney case
Chandrapur News : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, नागभीड तालुक्यातील घटना

संघर्षातून उभारीचा प्रयत्न

रोशन कुळे यांच्यावर सावकारी कर्ज, मानसिक व आर्थिक छळ, मालमत्ता गमावण्याची वेळ आणि कथित किडनी विक्रीसारखे गंभीर संकट ओढवले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने त्यांना न्याय देण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू केल्या आहेत. शेती, ट्रॅक्टर, गहाण ठेवलेले सोने आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असतानाच मुख्यमंत्री सहायता निधीतील ही मदत त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार मानली जात आहे.

प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी रोशन कुळे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया सुरू असल्याचा विश्वास प्रशासनाकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.

 Roshan Kule kidney case
Chandrapur News | रेती घाटांची जीपीएस ड्रोनद्वारे मोजणी सुरू; जिल्ह्यातील 74 घाटांची तपासणी

राज्यभर चर्चेत आलेले प्रकरण

रोशन कुळे प्रकरणामुळे सावकारी जाच, शेतकऱ्यांची बिकट आर्थिक अवस्था आणि कथित अवयव तस्करीच्या प्रश्नांवर राज्यभर चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणात आधीच काही आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळालेली ही मदत रोशन कुळे यांच्या आयुष्यात नव्या उभारीची सुरुवात ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news