

Beed Crime News
केज : अवैद्य दारू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. ही घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे ३ मे रोजी घडली.
या बाबतची माहिती अशी की, दिनांक ३ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील साळेगाव येथील सरकारमान्य देशी दारू दुकानातून एका कार मध्ये देशी दारूचे बॉक्स घेवून काही जण जात होते. सदर चोरटी अवैद्य दारू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून साळेगाव येथील काही युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गाडी अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला.
गाडी थांबविण्यासाठी त्यांनी ईशारा करताच सदर कार चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने चालवून युवकांच्या अंगावर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून त्या युवकांनी रस्त्या शेजारी असलेल्या नालीकडे उडी मारल्याने अनर्थ टळला.