Chandrapur Ganesh Visarjan | चंद्रपूर गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; 7 ठिकाणी पार्किंगची सुविधा

गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक प्रियदर्शनी चौक–जटपुरा गेट–कस्तुरबा चौक–गांधी चौक–जटपुरा गेट–रामनगर रोड–संत केवलराम चौक–ईरई नदी (रामसेतू पूल) या मार्गे
Chandrapur Ganesh Visarjan Traffic
Chandrapur Ganesh Visarjan TrafficAI photo
Published on
Updated on

Chandrapur Ganesh Visarjan Traffic Diversions

चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाचे वाहतूक बदल जाहीर केले आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नागरिकांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी अधिसूचना जारी केली आहे.

गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक प्रियदर्शनी चौक–जटपुरा गेट–कस्तुरबा चौक–गांधी चौक–जटपुरा गेट–रामनगर रोड–संत केवलराम चौक–ईरई नदी (रामसेतू पूल) या मार्गाने जाणार आहे. मिरवणूक पूर्ण होईपर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.

Chandrapur Ganesh Visarjan Traffic
Chandrapur News: वसतिगृहातील जेवणात झुरळ, अळ्या, वरणात किडे: विद्यार्थ्यांचा भोजनावर बहिष्कार

नागपूरकडून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

नागपूर रोडने येऊन बल्लारपूर किंवा मूलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी राहणार असून, ही वाहने वरोरा नाका उड्डाणपूल–सावरकर चौक–बंगाली कॅम्प मार्गे मूल किंवा बल्लारपूरकडे वळविण्यात येतील. तसेच मूल किंवा बल्लारपूरकडून नागपूरकडे जाणारी वाहनेही बंगाली कॅम्प–सावरकर चौक–वरोरा नाका नवीन उड्डाणपूल मार्गे नागपूरकडे जातील.

नागपूरकडून शहरात येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी छोटा नागपूर–दाताळा चौक–देवाळा गाव–चोराळा टी-पॉइंट मार्गे विनया गेट किंवा पठाणपुरा गेटमधून शहरात प्रवेश करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जड वाहनांना यामध्ये वगळण्यात आले आहे. चंद्रपूर शहरातील नागरिकांना नागपूर, वणी, घुग्घुस आणि गडचांदूरकडे जाण्यासाठी रहमतनगर, नगीना बाग आदी परिसरातून विनया गेट–चोराळा–दाताळा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrapur Ganesh Visarjan Traffic
Chandrapur sound system ban | उत्सव काळात डॉल्बी, प्लाझमा व प्रेशरमिड साऊंड सिस्टिमवर बंदी

मुख्य मार्गावर ‘नो पार्किंग’, ‘नो हॉकर्स झोन’

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जटपुरा गेट, कस्तुरबा चौक, गांधी चौक, अंचलेश्वर गेट, मिलन चौक, दस्तगीर चौक, जेल रोड चौक, बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल, रघुवंशी कॉम्प्लेक्स, मौलाना आझाद चौक, जयंत टॉकीज, छोटा बाजार चौक आणि पाताळेश्वर मंदिर परिसरासह संबंधित मिरवणूक मार्ग ‘नो पार्किंग’ व ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या मार्गावर नागरिक, व्यावसायिक तसेच गणेश मंडळांनी कोणतीही वाहने उभी करू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य मिरवणूक मार्गावरील रहिवाशांना स्वतःच्या वाहनांसाठी जागा नसल्यास जुबली हायस्कूलचे पटांगण किंवा महानगरपालिकेजवळील पार्किंग वापरता येणार आहे. मात्र, मिरवणूक संपल्यानंतरच ही वाहने तेथून काढता येणार आहेत.

नागरिकांसाठी सात पार्किंग झोन

विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी पोलिसांनी सात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये चांदा क्लब ग्राउंड,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल, नगीना बाग, सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौकाजवळ, रामनगर,  व्यायामशाळा ग्राउंड, पठाणपुरा चौक, डी.एड. कॉलेज ग्राउंड, बाबूपेठ, महाकाली मंदिर ग्राउंड, चंद्रपूर

या पार्किंग स्थळांचा वापर २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. नागरिकांनी आपली वाहने शहराच्या गर्दीच्या भागात न आणता निर्धारित पार्किंगस्थळी उभी करावीत, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

Chandrapur Ganesh Visarjan Traffic
Chandrapur Crime : वरोरा येथील आनंदवन चौकात ४ किलो १७४ ग्रॅम गांजा जप्त; दोघांना अटक!

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी निश्चित केलेल्या मार्गाचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच नागरिकांनी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचनेतील नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

गणेश मंडळे आणि नागरिकांनी विसर्जन सोहळ्यादरम्यान पोलिसांना सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news