

Nilesh Tajne municipal president
चंद्रपूर : गडचंदूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे उलथून टाकत भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार निलेश ताजने यांनी नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला. शेतकरी संघटनेसह युती करून स्थापन केलेल्या ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून ताजने यांनी निवडणूक लढवली होती. तब्बल दोन हजार मतांची आघाडी घेत त्यांनी नगराध्यक्षपद पटकावत गडचंदूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे.
गडचंदूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. अपक्ष आघाडीच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या निलेश ताजने यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का दिला. निकालानंतर प्रतिक्रिया देताना ताजने म्हणाले, “हा विजय गडचंदूरच्या स्वाभिमानाचा आहे. अहंकार वाढलेल्या नेत्यांचा अहंकार जनतेने मोडीत काढला असून नागरिकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आहे.”
यावेळी त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत राजकीय अहंकारावरही भाष्य केले.
या निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार निवडून आले असले तरी अपक्ष ‘ताजने गट’ने महत्त्वाची मते मिळवत निर्णायक भूमिका बजावली आहे. एकूण निकाल पाहता भाजप सर्वाधिक जागा मिळवण्यात यशस्वी ठरला असला, तरी नगराध्यक्षपद अपक्षांकडे गेल्याने सत्तेचे समीकरण बदलले आहे.
नगराध्यक्ष :
निलेश ताजने (अपक्ष – ताजने गट)
प्रभाग १ :
रामसेवक मोरे (ताजने गट)
अर्चना मोरे (काँग्रेस)
प्रभाग २ :
हिमांशू नमावाड (भाजप)
डोरलीकर बाई (ताजने गट)
प्रभाग ३ :
तुषार बावणे (काँग्रेस)
प्रणिता उपाध्ये (काँग्रेस)
प्रभाग ४ :
महेश आवारी (ताजने गट)
शितल धोटे (भाजप)
प्रभाग ५ :
संजय भाऊ मेंढी (काँग्रेस)
अश्विनी कांबळे (ताजने गट)
प्रभाग ६ :
शेख सरवर (मशाल)
मनिषा परचाके (काँग्रेस)
प्रभाग ७ :
चेतन शेंडे (काँग्रेस)
कीर्ती वैरागडे (भाजप)
प्रभाग ८ :
सुरेश मेश्राम (भाजप)
शेख खाजा (ताजने गट)
प्रभाग ९ :
सतीश बेतावर (भाजप)
संगीता गाऊत्रे (भाजप)
प्रभाग १० :
सूरज पांडे (भाजप)
सपना शेलोकर (भाजप)
पक्षनिहाय निकाल :
भाजप : ८, काँग्रेस : ६, ताजने गट (अपक्ष) : ५
मशाल : १
या निकालामुळे गडचंदूर नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, अपक्ष नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.