Chandrapur Municipal Election | गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत फेट्यांचा रंगतदार तुरा; निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटे घालून मतदान केंद्रांची पाहणी

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अधिकाऱ्यांची आगळीवेगळी युक्ती
Polling center inspection
Polling Center InspectionPudhari
Published on
Updated on

Gadchandur Municipal Council election

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात आज (दि. २) नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सुरू असताना एक वेगळीच रंगत पाहायला मिळाली. एरवी लग्न, शुभकार्य, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दिसणारे फेटे आज शहरातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या डोक्यावर झळकत होते. मतदानाचा दिवस नागरिकांसाठी उत्सवमय व्हावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर लोकशाहीचा एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळत आहे.

गडचांदूर शहरात आज मंगळवारी नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलले. शहरभरातील अनेक मतदान केंद्रांवर अधिकार्‍यांनी डोक्यावर पारंपरिक फेटे परिधान करून नियमित पाहणी केली. या अनोख्या उपक्रमाची शहरभर व्यापक चर्चा होत असून मतदारांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Polling center inspection
Chandrapur Municipal Elections | नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३ जण हद्दपार; मात्र, मतदानाचा अधिकार कायम

सावित्रीबाई फुले शाळा मतदान केंद्रावर पालिका मुख्याधिकारी आशीष चव्हाण स्वतः फेटा घालून आपल्या पथकासह पाहणीसाठी पोहोचले. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की,

“लोकशाही हा आपला उत्सव आहे. नागरिकांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा आणि मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी हा छोटासा पण महत्त्वाचा उपक्रम राबविला आहे. मतदारांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा, हा आमचा हेतू आहे.”

मुख्याधिकारी चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळपासून विविध केंद्रांवर भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. फेटे परिधान केलेल्या अधिकाऱ्यांना पाहून मतदारही उत्साही होत असल्याचे चित्र अनेक केंद्रांवर दिसून आले. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत “मतदानाची वातावरण निर्मिती करण्याचा हा उत्तम प्रयत्न” असल्याचे मत व्यक्त केले.

Polling center inspection
Chandrapur News | चंद्रपूर जिल्हाधिका-यांकडून घुग्गुस, भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी

निवडणूक प्रक्रियेतील गंभीरता, शिस्त आणि नियमबाह्य गोष्टींवर लक्ष ठेवतानाच उत्साहवर्धक माहोल तयार करण्याचा चव्हाण यांचा हा उपक्रम शहरात चांगलाच चर्चेत आला आहे. पारंपरिक पोशाखातील अधिकारी आणि लोकशाहीचा आधुनिक उत्सव यांचा संगम आज गडचांदूरमध्ये अनुभवायला मिळाला.

मतदान केंद्रांवर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच मतदार उपस्थित होत असून या उपक्रमामुळे मतदानात अजून वाढ होईल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news