Chandrapur Racket : एका पिशवीने उघड केले गुपीत : बनावट डिग्री-सूत्रधार नागपुरातून अटकेत! ५ लाख रुपयांना एक डिग्री!

परिमल गौरकार पोलिसांच्या जाळ्यात; मदत करणारा अक्षय खोब्रागडेही गजाआड, आतापर्यंत तिघांना अटक
Chandrapur Racket : एका पिशवीने उघड केले गुपीत: बनावट डिग्री-सूत्रधार नागपुरातून अटकेत! ५ लाख रुपयांना एक डिग्री!
Chandrapur Racket : एका पिशवीने उघड केले गुपीत: बनावट डिग्री-सूत्रधार नागपुरातून अटकेत! ५ लाख रुपयांना एक डिग्री!
Published on
Updated on

चंद्रपूर :  चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या बनावट पदवी आणि गुणपत्रिका रॅकेटचा मुख्य सूत्रधार परिमल गौरकार याला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. त्याला मदत करणारा अक्षय खोब्रागडे यालाही पोलिसांनी गजाआड केले आहे. यापूर्वी वैभव सोनुले याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, तपासाला वेग आला आहे. या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय असून, आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे शिक्षण आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच चंद्रपुरात शिक्षण व्यवस्थेलाच हादरविणारा हा प्रकार समोर आला आहे. लाखो रुपये घेत नामांकित विद्यापीठांच्या नावाने बनावट पदव्या, गुणपत्रिका, डिप्लोमा तसेच मायग्रेशन प्रमाणपत्रे तयार करून दिली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

Chandrapur Racket : एका पिशवीने उघड केले गुपीत: बनावट डिग्री-सूत्रधार नागपुरातून अटकेत! ५ लाख रुपयांना एक डिग्री!
Chandrapur Racket | ‘द्या पैसा, घ्या डिग्री!’ : चंद्रपुरात बनावट मार्कशीट- पदवी रॅकेटचा पर्दाफाश!

उच्चशिक्षित परिमलच रॅकेटचा सूत्रधार

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार परिमल गौरकार हा उच्चशिक्षित असून उच्चभ्रू जीवनशैली जगत असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपुरातील तुकूम परिसरातील एसटी वर्कशॉप चौकात राहणाऱ्या परिमलने जानेवारी महिन्यात आपल्या शेजाऱ्याकडे एक कापडी पिशवी ठेवली होती. काही कारणास्तव अनेक महिने तो ही पिशवी परत घेण्यासाठी आला नाही.

पिशवी उघडताच शेजाऱ्याला धक्का

अनेक महिने उलटूनही परिमल पिशवी घेण्यासाठी न आल्याने शेजाऱ्याला कुतूहल निर्माण झाले. त्याने पिशवी उघडली असता त्यामध्ये विविध विद्यापीठांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या पदव्या आणि प्रमाणपत्रांचा मोठा साठा आढळून आला. या प्रकारामुळे शेजाऱ्याला धक्काच बसला.

याबाबत परिमलकडे फोनवरून विचारणा केली असता, आपण बनावट पदवी व प्रमाणपत्रे तयार करून ती ५ ते १० लाख रुपयांपर्यंत विकत असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे. यानंतर शेजाऱ्याने विलंब न करता दुर्गापूर पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण कापडी पिशवी आणि त्यातील कागदपत्रे पोलिसांच्या स्वाधीन केली.

विद्यापीठांकडे कागदपत्रे तपासणीसाठी

पोलिसांनी ही कागदपत्रे जप्त करून त्यांची सत्यता तपासण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासात त्यातील पदव्या आणि प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

आता पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि इतर प्रमाणपत्रांची संबंधित विद्यापीठांकडून अधिकृत पडताळणी सुरू केली आहे. ही कागदपत्रे संबंधित विद्यापीठांनी जारी केली आहेत का, त्यावरील नोंदी खऱ्या आहेत का, तसेच त्यांचा वापर कुठे करण्यात आला आहे, याचा तपास केला जात आहे.

रॅकेटचे जाळे किती मोठे?

परिमल गौरकार याच्या अटकेनंतर या रॅकेटच्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी कोणाची मदत घेतली जात होती, ग्राहक कोण होते, किती जणांना अशा पदव्या व गुणपत्रिका देण्यात आल्या आणि या व्यवहारातून किती रुपयांची उलाढाल झाली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आणखी काही संशयित पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता असून, तपास जसजसा पुढे जाईल तसतसे या रॅकेटचे धागेदोरे इतर शहरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता शैक्षणिक आणि भरती क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news