Chandrapur Drug Seized | चंद्रपूरमध्ये ड्रग्स माफियांवर कारवाई: एमडी ड्रग्ससह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

रामनगर पोलीस ठाण्यात NDPS अंतर्गत गुन्हा नोंद
MD drugs seizure Chandrapur
MD drugs seizure ChandrapurPudhari
Published on
Updated on

MD drugs seizure Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नागपूर रोडवरील धाब्याजवळ दोन तरुणांना एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स पावडरसह अटक करण्यात आली असून एकूण 2,00,260 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुरुवारी ( ०४ डिसेंबर २०२५) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने अंमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष ठेवून पेट्रोलिंग सुरू केले होते. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रोव्हीशन, जुगार, तसेच अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात होती. त्यादरम्यान पथकाला गोपनीय सूत्रांमार्फत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

MD drugs seizure Chandrapur
Chandrapur Municipal Elections | चंद्रपूर जिल्ह्यात स्थगित झालेल्या नगर परिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

त्या माहितीनुसार, आरोपी प्रांजल राकेश तिवारी (वय२४)  रा. माळा कॉलनी, क्वार्टर क्रमांक ३०८ आणि अदनान जाकीर शेख (वय २४) रा. माळा ऑटो कॉलनी, क्वार्टर क्रमांक बी-२०१) हे मोटारसायकलने नागपूर रोड, धाब्या जवळ येणार असल्याचे समजले. यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान त्यांच्याकडून १३.५० ग्रॅम एमडी (MEPHEDRONE) सदृश पांढऱ्या रंगाची ड्रग्ज पावडर, मोटारसायकल, रोख रक्कम व दोन मोबाईल फोन असा एकूण 2,00,260 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

MD drugs seizure Chandrapur
Chandrapur Municipal Elections | नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३ जण हद्दपार; मात्र, मतदानाचा अधिकार कायम

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात  पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दीपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअ किशोर वाकाटे, पोशि शशांक बदामवार, पोशि हिरालाल गुप्ता व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news