Chandrapur News | बीजी वेलच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; नागरिकांना दुप्पट पैशांचे आमिष!

 Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

चंद्रपूर :  अमेरिकन कंपनीचे नाव सांगून अवघ्या दोन महिन्यांत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी बीजी वेल शेड्युलिंगशी संबंधित एजंट, वितरक व त्यांच्या साथीदारांविरोधात वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, जळका (माढळी) येथील रहिवासी संदीप वाघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर पैसे परत मिळवण्यासाठी संपर्क साधला असता टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात अशोक वाघाडे यांच्याकडून १ लाख रुपये, सुषमा गोहळकर यांच्याकडून ६ लाख रुपये, रेखा वाघाडे यांच्याकडून १.१० लाख रुपये, राणी बचेकर यांच्याकडून ४५ हजार रुपये आणि आशा जांघे यांच्याकडून ५० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 Fraud
Chandrapur News | ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात आटमुर्डीत संताप, हिशोबासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी वरोरा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

या प्रकरणात आणखी किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, तसेच एकूण किती रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही आकर्षक गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत माहिती व कायदेशीर नोंदणी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news