Chandrapur Illegal Sand Mining | बामणडोह नाल्यात अवैध रेती उत्खनन; वरोरा पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई

चार ट्रॅक्टर जप्त; चालक-मालकांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, २८.१७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Bamandoh Nalah Raid
अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर वरोरा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केलीPudhari
Published on: 
Updated on: 

Bamandoh Nalah Raid

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील रानतळोधी गावाजवळील बामणडोह नाल्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर वरोरा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत चार ट्रॅक्टर व ट्रॉलींसह रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २८ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार ट्रॅक्टर चालक आणि चार मालक अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार हे पोलीस पथकासह हद्दीत गस्त घालत असताना बामणडोह नाल्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी चार ट्रॅक्टरमध्ये रेती भरली जात असल्याचे आढळले. पोलिसांना पाहताच रेती भरणारे मजूर पसार झाले, मात्र चार ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेण्यात आले.

Bamandoh Nalah Raid
Chandrapur Tiger Capture | महिलेचा बळी घेणारा, पळसगावात दहशत माजविणारा टी-१७९ वाघ अखेर जेरबंद

ताब्यात घेतलेल्या चालकांची नावे हरीदास राघोजी देशकर (वय ५०) मजरा,  शंकर लक्ष्मण गेडाम (२९वय), परसोडा, अनिल नारायण उईके (वय ४०), चिनोरा खदान आणि रोशन लिलेश्वर कुरजेकार (वय २६) मजरा) अशी आहेत. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे रेती उत्खननाचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित ट्रॅक्टर मालकांच्या सांगण्यावरून उत्खनन सुरू असल्याची माहितीही चालकांनी दिली.

या प्रकरणात ट्रॅक्टर मालक मनोज गजानन कुरजेकार (मजरा), सुधाकर रामदास वरभे (गाडगेनगर, वरोरा), ईश्वर रमेश भोंगडे (मजरा) आणि बलम यांची नावे निष्पन्न झाली आहेत.

कारवाईदरम्यान महिंद्रा, स्वराज आणि आयशर कंपनीचे चार ट्रॅक्टर, ट्रॉली, अंदाजे अडीच ब्रास रेती, १२ पावडे आणि १२ प्लास्टिक घमेले असा एकूण २८ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करून जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

Bamandoh Nalah Raid
Chandrapur Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा बळी, गुराखी गंभीर जखमी

पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संदीप मुळे, पोलीस अंमलदार मनोज ठाकरे आणि विशाल राजुरकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.