Chandrapur Crime | चंद्रपुरातील एटीएम कटींग टोळीचा पर्दाफाश: १३ दिवसांनंतर तेलंगणातून एक जण अटक

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
ATM cutting gang
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांनी राजस्थानमधील एक आरोपीला अटक केली.(Pudhari Photo)
Published on
Updated on

ATM cutting gang

चंद्रपूर : घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एटीएम कटींग प्रकरणाचा थरार अखेर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक परिश्रमामुळे उलगडला आहे. तब्बल १३ दिवसांच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी राजस्थानमधील एक आरोपीला अटक करून मोठा यश मिळवले आहे.

दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री घुग्घुस पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून तब्बल १० लाख ९२ हजार ८०० रुपये लंपास केले. याबाबत तक्रार दाखल होताच गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली.

ATM cutting gang
Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्याचे २७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर

घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. गुन्ह्यात वापरलेले क्रमांक लपविलेले महिंद्रा बोलेरो वाहन पोलिसांच्या रडारवर आले. यासाठी तब्बल ९०० ते १००० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दिवस-रात्र अथक परिश्रम घेत १३ दिवस सलग तांत्रिक तपास करून आरोपीचा माग काढण्यात यश आले.

तपासादरम्यान पोलिसांनी जिल्ली सिरदार खान (वय ५२) रा. सबलगड, ता. कामा, जि. भरतपूर, राजस्थान) यास तेलंगणातील चिन्नुर, जि. मंचेरियाल येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या इतर साथीदारांची नावे उघडकीस आणली. त्यामध्ये साजीद खान राजुद्दीन  रा. भाकडोजी, पोस्ट फिरोजपुर झिरका, जि. नुह, हरियाणा, शेकुल उन्नस खान  रा. सावलेर, पोस्ट पहाडी, जि. डिग, राजस्थान, काला – रा. गुमटकी, बडकली चौकी, पोस्ट नगीना, जि. नुह, हरियाणा अशी आहेत. चंद्रपूर पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

ATM cutting gang
Chandrapur Orange Alert | चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेज अलर्ट: शाळांना सुटी जाहीर; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सध्या आरोपी जिल्ली सिरदार खान याला  घुग्घुस पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपास कौशल्यामुळे एटीएम कटींगसारख्या गंभीर गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून लवकरच संपूर्ण टोळीला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई यशस्वी होण्यात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे  नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, तसेच सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगर, इमरान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बादामवार, मिलींद जांभुळे, रुषभ बारसिंगे यांचेसह  स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news