Chandrapur Fraud | 'दैवी शक्ती’च्या नावाखाली २५.९० लाखांचा गंडा; तीन भोंदू महिलांना अटक

आजारी पती बरा करणे, पैसे डबल करणे आणि घराचे कल्याण होईल, अशी भुलथाप
Chandrapur  Women Arrested For Cheating
Chandrapur Women Arrested For CheatingAI Photo
Published on
Updated on

Chandrapur Women Arrested For Cheating

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, "माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, तुझे आजारी पती बरे होतील आणि घरातील पैसे डबल होतील," अशी बतावणी करून एका महिलेला तब्बल २५ लाख ९० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने गंडविण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी तीन भोंदू महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून तावीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

चंद्रपूर शहरातील जोड देऊळ, पठाणपुरा वॉर्ड येथे राहणाऱ्या वैशाली अनिल खणके यांच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला. इराई नदीवरील पुलासाठी त्यांची जमीन संपादित झाल्याने भरपाईपोटी त्यांना ७१ लाख रुपये मिळाले होते. त्याचदरम्यान शेजारी भाड्याने राहण्यासाठी आलेल्या विद्या विठ्ठलराव निमजे हिने वैशाली यांच्याशी ओळख वाढवून त्यांच्या आजारी पतीच्या प्रकृतीचा गैरफायदा घेतला.

Chandrapur  Women Arrested For Cheating
Chandrapur Fraud | मालमत्ता, सोने व्यवहाराच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

"माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. धुनीची पावडर आणि तावीज वापरल्यास तुमचे पती पूर्ण बरे होतील," असे सांगत विद्याने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी चेकद्वारे आणखी ५ लाख २५ हजार रुपये उकळले.

यानंतर धुनीची पावडर, चिठ्ठ्या आणि तावीज देऊन घराचे कल्याण होईल, असा विश्वास निर्माण करण्यात आला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात "पूजेसाठी" सांगून वैशाली यांच्या कानातील सोन्याचे टॉप्स आणि गळ्यातील पोत घेतले. त्यानंतर त्यांना बँकेत नेऊन १० लाख रुपये रोख काढण्यास भाग पाडले. दुसऱ्याच दिवशी घर खरेदीसाठी ठेवलेले आणखी १० लाख रुपये घेऊन विद्या फरार झाली.

Chandrapur  Women Arrested For Cheating
Chandrapur news: एकाच दिवशी दोन टोकाचे प्रसंग! रेल्वेखाली अस्वलीचा मृत्यू; लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने वाघाचा जीव वाचला

तपासात हडप केलेल्या रकमेपैकी काही पैसे शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम यांच्याकडे दिल्याचे समोर आले. कोणताही फायदा न झाल्याने वैशाली यांनी पैसे परत मागितले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

त्यानंतर वैशाली खणके यांनी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही महिलांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून तावीज, धुनीची पावडर आणि अंधश्रद्धा पसरविण्यासाठी वापरलेले इतर साहित्य जप्त केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news