Nagpur Crime News : नात्याला काळिमा !मोबाईलवेड्या वासनांध भावाने बहिणीवर केला अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाहून हे कृत्य केल्याची कबुली आरोपी भावाने पोलिसांसमोर दिली आहे
Nagpur Crime News : नात्याला काळिमा !मोबाईलवेड्या वासनांध भावाने बहिणीवर केला अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल
Published on
Updated on

नागपूर : मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाहून सख्ख्या भावाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. नात्याला काळिमा फासणाऱ्या भावाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी १६ वर्षीय मुलाविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. ही १२ वर्षीय मुलगी व तिचा भाऊ शिक्षण घेत आहेत. तिचे वडील खासगी काम करतात. मुलगा सतत मोबाइल बघत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मोबाइलवर अश्लील चित्रफित बघितली. घरी कोणी नसताना वासनांध भावाने बहिणीवर बलात्कार केला. यानंतर तो तिचे वारंवार शारीरिक शोषण करायला लागला.

दोन दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली असता हॉस्पिटलमध्ये तपासणीत ती गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याने पालकांना धक्काच बसला. मुलीची चौकशी केली असता भावानेच अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पालकांनी कळमेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाहून आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news