

चंद्रपूर : सोमवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत पडलेला संततधार पाऊस व गोसेखुर्द धरणातील विसर्ग होत असलेल्या पाण्यामुळे वैनगंगेला आलेल्या पुराने ब्रह्मपुरी तालुक्यातील अजूनही 30 गावांच्या संपर्क तुटलेलाच आहे. वैनगंगेला आलेला पूर आता हळूहळू ओसरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारच्या मध्यरात्री पासून बुधवारी सकाळ पर्यंत संततधार पाऊस कोसळला. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. सोमवार व मंगळवारी दोन्ही दिवस ब्रम्हपुरी तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली. त्यात भर पडली ती वैनगंगेत सोडलेल्या गोसेखुर्द धरणातील पाण्याची. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली.
बुधवारी सकाळी अकरा वाजतापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु त्या पूर्वी धो धो पडलेल्या पावसाने ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती गंभीर बनली. नदी काठावरील लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव प्रभावित झाली. तर ब्रम्हपुरी तालुक्यातील तिस गावांचा पुरामुळे संपर्क तुटला.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पण्याचा विसर्ग वैनगंगेत सततसुरू असल्यामुळे पुरामुळे तालुक्यातील तिस गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामध्ये मांगली, गवराळा, जुगनाळा, चौगान,गांगलवाडी, पारडगाव, बेटाळा, बोरगाव, चिंचोली, हरदोली, सुरबोडी, सौंदरी, झिलबोडी, परसोडी, नवेगाव, कोथूर्णा, सोनेगाव, बोंडेगाव , सावलगाव, चिखलगाव, लाडज, निलज, कन्हाळगवा, अऱ्हेर, नवरगाव, पिंपळगाव, नांदगाव, नान्होरी आदी गावांचा समोवश आहे. आज गुरुवारी चौवीस तासानंतरही तीस गावांचा संपर्क ब्रम्हपुरी सोबत तुटलेलाच आहे. परंतु हजारो हेक्टर जमीन शेतजमीन पाण्याखालीच आहे. पाण्याखाली सापडलेला आवत्या, धानाचे पऱ्हे, रोवणी सड न्याची शक्यता वर्तविली जात आहे. अजूनही ब्रह्मपुरी तालुक्यात पूर परिस्थिती जैसेtथे आहे. काल पासून गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 गेट दोन ते अडीच मीटरने सुरू असलेले सर्वच गेट आता अर्धा मीटरने सुरू आहेत. त्यामुळे वैनगंगेत पाण्याचा विसर्ग होत आहे. मात्र वैनगंगेच्या पुराचे पाणी आता हळूहळू ओसरू लागले आहे.