IPL सामन्यावर सट्टा; चंद्रपूर LCB ची कारवाई, युवक जेरबंद

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यावर ऑनलाइन बेटिंग; मोबाईल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
Betting on IPL Match: Chandrapur LCB Takes Action; Chandrapur LCB action, youth arrested
IPL सामन्यावर सट्टा; चंद्रपूर LCB ची कारवाई, युवक जेरबंदFile Photo
Published on
Updated on

Betting on IPL Match: Chandrapur LCB Takes Action; Chandrapur LCB action, youth arrested

चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूरमध्ये IPL सामन्यावर सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत एका युवकाला रंगेहात पकडले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून मोबाईलसह संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

शहरात सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामन्यांदरम्यान सट्टेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दि. २२ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दूध डेरी परिसर, RTO रोड येथे छापा टाकण्यात आला.

Betting on IPL Match: Chandrapur LCB Takes Action; Chandrapur LCB action, youth arrested
गडचांदुरमध्ये IPL सामन्यावर ऑनलाईन क्रिकेट सट्टा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या IPL सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला.

रेडदरम्यान संशयित आरोपी प्रणय वेकटेश चिलमलवार (वय २४ वर्षे, रा. अहेरी, जि. गडचिरोली) हा मोबाईलच्या माध्यमातून www.nice7777.fun या बेटिंग आयडीवर सट्टा खेळताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त केला.

Betting on IPL Match: Chandrapur LCB Takes Action; Chandrapur LCB action, youth arrested
Thane online cricket betting : ठाण्यात क्रिकेटचे ऑनलाईन बेटिंग चालविणाऱ्या दोघांना अटक

तपासादरम्यान इरफान खान (रा. अहेरी, जि. गडचिरोली) याने संबंधित बेटिंग आयडी उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी प्रणय चिलमलवार आणि इरफान खान या दोघांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमातील कलम १२ (A) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ४९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news