Tiger vs Bear : जंगलच्या राजाशी अस्वलाचा संघर्ष, सुप्रिया सुळेंनी शेअर केला व्हिडिओ, इथे कोणीच नसतो कायमचा विजेता..

“जंगलचा राजा झाला हतबल! ताडोबात अस्वलासमोर वाघाने मानली हार”
Tiger vs Bear
Tiger vs Bear : जंगलच्या राजाशी अस्वलाचा संघर्ष, सुप्रिया सुळेंनी शेअर केला व्हिडिओ, ते म्हणाले इथे कोणीच कायमचा विजेता नसतो file photo
Published on
Updated on

Bear's Clash with the King of the Jungle: Supriya Sule Shares Video

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील जंगलातून समोर आलेल्या एका थरारक व्हिडीओने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. जंगलातील सर्वात भयंकर शिकारी मानला जाणारा वाघ आणि एका आक्रमक अस्वलामधील ही झुंज पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या संघर्षात अखेर वाघालाच माघार घ्यावी लागल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. हा व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे  यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tiger vs Bear
Tiger vs Bear | थरार ताडोबाचा! दोन चवताळलेल्या अस्वलांसमोर जंगलाचा राजा झाला हतबल, घटनेचा video viral

हा व्हिडिओ ताडोबा अभयारण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. पानवट्यासमोर वाघ आणि अस्वालामध्ये झुंज असल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये अस्वल अत्यंत आक्रमक पवित्रा घेत वारंवार वाघावर हल्ला करताना दिसत आहे. तीक्ष्ण पंजे, वेगवान हालचाली आणि सततचा दबाव यामुळे सुरुवातीला आक्रमक दिसणारा वाघ काही क्षणांतच बचावात्मक भूमिका घेत आहे.

परिस्थिती इतकी बदलते की, शिकार करण्याच्या तयारीत असलेला वाघ अखेरीस स्वतःचा जीव वाचवत मागे हटताना दिसतो. अस्वल त्याचा पाठलाग करीत पिटाळून लावताना दिसत आहे. हाच व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया वरती शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी त्याचा लोकेशन ताडोबा सांगितले आहे. जंगलातील शक्तीचा समतोल आणि वन्यप्राण्यांमधील नैसर्गिक संघर्ष या व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येतो.

Tiger vs Bear
Tadoba Tiger Reserve | कान्हा अभयारण्यात CDV विषाणूमुळे वाघिणीसह ४ बछड्यांचा मृत्यू : ताडोबातील वाघांवर करडी नजर

विशेष म्हणजे, यापूर्वीही बुद्ध पौर्णिमेच्या काळात ताडोबात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी दोन अस्वलांनी मिळून एका वाघाला जंगलातून पळवून लावल्याचा प्रकार पर्यटकांनी पाहिला होता. ताडोबाच्या जंगलामध्ये वाघावर अस्वलच भारी पडत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ताडोबातील या रोमहर्षक संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, “जंगलात कायमचा विजेता कुणीच नसतो,” अशा प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news