छत्तीसगड: जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात; 16 जनावरे मृत्युमुखी

छत्तीसगडमधील मूल येथी घटना
Truck Accident At Chattisgarh
मूल जवळ झालेल्या अपघातात क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढला जात आहे. Pudhari File photo
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : ट्रकमध्ये जनावरे कोंबून घेवून जाणाऱ्या ट्रकचा छत्तीसगडमधील मूल येथे बुधवारी (दि.17) अपघात झाला. या अपघातात सुमारे 16 जनावरे मृत झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. अपघातानंतर ट्रक चालकासह इतर ट्रकमधील इतर संथयित आरोपी फरार झाले आहेत. ही जनावरे गडचिरोली मधून हैद्राबादला कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची शंका वर्तविली जात आहे.

वर्धा : कंटेनर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ जनावरे जखमी

मूलजवळ आकापूर वळणावर (सीजी 07 सीबी 0717) या क्रमांकाचा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये 30 ते 35 जनावरे कोंबून भरली होती. ट्रक उलटल्यामुळे यामधील सोळा जनावरे ट्रक खाली सापडून मृत्यमुखी पडली. अन्य जनावरे अपघातानंतर पळाली. अपघातानंतर ट्रक चालक आणि इतर सहकारी पळून गेल्यामुळे जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत होती, अशी शंका वर्तविली जात आहे. या घटनेचा तपास मूल पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिस करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news