वर्धा : कंटेनर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ जनावरे जखमी

Published on
Updated on

वर्धा : पुढारी वृत्तसेवा 

अवैधरित्या जनावर वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला. या अपघातात 37 जनावरांचा मृत्यू झाला तर 11 जनावरे जखमी झाली आहेत. अमरावती ते नागपुरात मार्गावरील सावळी शिवारात बुधवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास अपघात घडला.  

सावळी शिवारात कंटेनर पलटी झाल्याची माहिती कारंजा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून पाहणी केली. HR  55 S 8795 क्रमांकाचा ट्रेलर नागपूरवरून अमरावतीकडे जाताना सावळी (खुर्द) गावाजवळील चढाव मार्गाजवळ पहाटेच्या दरम्यान पलटी झाला. ट्रेलरमध्ये जनावरे भरली होती. अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाल्याची माहिती आहे. ट्रेलर मधील 37 जनावरांचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला तर 11 जनावरे जखमी झाली आहेत. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाहेर काढण्यात आला. जखमी जनावरांना पशु वैद्यकीय अधिकारी जोगेकर, डॉ.घुमडे यांनी प्राथमिक औषधोपचार केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहदुळे, पीएसआय मानकर, किशोर कडू, पवन लव्हाळे, नितेश वैध, प्रशांत मानमोडे, अतुल अडसड, मनोज  सूर्यवंशी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांनी पाजले जखमी जनावरांना पाणी 

कारंजा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली असता ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताबडतोब जखमी झालेल्या जनावरांना व मृत जनावरांना बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या.. मृत पावलेल्या  जनावरांना वेगळ्या बाजूला व जखमी झालेल्या जनावरांना वेगळ्या बाजूला करण्याची व्यवस्था केली.  ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल. पोलिसांनी स्वतः जनावरांना  पाणी पाजले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news