चंद्रपूर : अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीपात्रात बुडून मृत्यू

चंद्रपूर : अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीपात्रात बुडून मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  वर्धा इरई नदीच्या संगमावर अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या तिघांना जलसमाधी मिळाल्याची दुदैवी घटना आज रविवारी (दि.१९) घडली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे ( वय ४७), त्यांचा एकुलता मुलगा चेतन गोविंदा पोडे ( वय १६ ) व भाचा गणेश रवींद्र उपरे (वय १७) यांचा बुडून मृत्यू झाला. तिघांचेही मृत्तदेह मिळाले आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम झित्राजि पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी आज (दि.१९) वर्धा – इरई नदीच्या संगमावर दुपारी २ वाजता हे तिघेही कुटुंबासह आले होते. दरम्यान मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात पडल्याने बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी उपसभापती गोविंदा पोडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र ते पाण्याचा अंदाज न आल्याने तेही बुडाले. तिघानाही वर्धा नदीपात्रात जलसमाधी मिळाली.

गोविदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचे देखील माजी सभापती होते. कुंटुंबातील सदस्यांसमोर एकाच कुंटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान शोध मोहिमेत आज सायंकाळी मुलगा चेतन पोडे याचा तर वडील व भाचाचा मृत्तदेह उशिरा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे एस.पी.रवींद्रसिहं परदेशीं, बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिहं राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news