चंद्रपूर : पर्यटनासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना रिसोर्टप्रमाणे कुटी तयार करून देण्यासाठी गुंतवणुकदारांकडून पैसा घेऊनही बांधकाम करण्यात आले नाही. याप्रकरणी बांधकामासाठी 41 हजार 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भरत नानाजी धोटे (वय.38, रा. तुकूम, चंद्रपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शादेण्यता आला असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मात्र फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्यादी तर्फे अशोक पांडुरंग भटवलकर (रा.म्हॉडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर) यांनी फसवणूक केल्याप्रकरणी भरत नानाजी धोटे यांचे विरोधत तक्रार दाखल केली आहे. सदर आरोपीने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाची खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले आहेत. त्यांच्या सहाय्याने पद्मापूर, अजयपूर, देवाडा, तळोधी (नाईक), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम करण्याबाबत युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा केला होता.
ताडोबा राष्ट्रीय वन उद्यान येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना रिसोर्टप्रमाणे कुटी भाडे तत्वावर देऊन मासिक उत्पन्न 7083 रुपये देण्याचे प्रलोभन देवून प्रत्येक गुंतवणुकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कुटीचे बांधकाम न करता गुंतवणूकदारांकडून 41 लक्ष 50 हजार रुपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांना लक्षात येताच त्यांनी दर्गापूर पालिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी भरत धोटे याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून संशयीत आरोपी भरत नानाजी धोटे हा पसार झाला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.