चंद्रपूर : ‘त्या’ महिलेच्या मृतदेहावर रिपोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न

 मिना विकास जांभूळकर
मिना विकास जांभूळकर
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या चिमूर तालुक्यातील केवाडा येथील एका दाम्पत्यावर वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला होता. सोबत असलेला पती तब्बल गंभीर जखमी झाल्याने १९ तास जंगलात बेपत्ता राहिला. दुसऱ्या दिवशी बुधवारी घटनास्थळापासून ५०० मीटर परिसरात पती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना, पती विकास जांभूळकर ज्या स्थितीत आढळून आला, त्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे चिमूर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतर बुधवारी (२५ मे) पुन्हा मृतदेह चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. 'त्या' महिलेच्या मृतदेहावर रिपोर्स्टमार्टम करण्याचा वनविभागाकडून प्रयत्न झाला. परंतु पहिला पोर्स्टमार्टम् अहवाल ग्राह्य धरून रिपोर्स्टमार्टम करण्यास जिल्हा सामान्य रूग्णालयाने स्पष्ट नकार दिला.

मृतदेह परत चिमूरला वापस आणण्याची वेळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परिणामत: ३६ तासानंतरही त्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाही. मिना विकास जांभूळकर (वय ४५ ) असे मृत पत्नीचे नाव आहे.

चिमूर तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभूळकर आणि पत्नी मिना हे दोघेजण तेंदूपत्ता तोडण्यासाठी केवाडा येथील कक्ष क्रमांक ३४ मध्ये काल मंगळवारी सकाळी गेले होते. जांभूळकर दाम्पत्य तेंदूपत्ता तोडत असताना जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने या दाम्पत्यावर हल्ला केल्याने पत्नी मिना हिचा मृत्यू झाला होता.

वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून तातडीने त्या महिलेच्या कुटूंबियांना २५ हजारांची तातडीने मदत केली होती. मात्र पत्नीसोबत असलेला पती बेपत्ता होता. काल मंगळवारी वनविभागाने दिवसभर शोधकार्य राबवूनही त्याचा पत्ता लागलेला नव्हता.

मंगळवारीच चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात मिना जांभूळकर यांचे मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्याने सदर महिलेचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला होता. पतीचा शोध न लागल्यामुळे बुधवारी पुन्हा सकाळी क्षेत्रसहाय्यक रासेकर, वनरक्षक नागरे, पिआरटी चमू व स्थानिक नागरिकांनी कक्ष क्रमांक ३४ मध्ये सकाळपासून शोधमोहीम राबविली.

घटनास्थळापासून ५०० मीटर परिसरात पिआरटी चमूचे विनोद चौधरी व सतीश बावणे यांना डोक्याला गंभीर जखमी बेशूध्दावस्थेत पती विकास जांळभूळकर हा जिवंत आढळून आला. डोक्याला गंभीर जखम, बेशुध्दावस्थेत पडून असलेला, पाण्याची मागणी करीत होता आणि तो जिवंत होता. तो बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. घाबरलेला आणी फक्त रडत होता. नागरिकांनी त्याला उचलून गावालगत आणले. डोक्यावर वाघाने पंजाचा वार केल्याने शरीर रक्तबंबाळ झालेला होता.

मंगळवारच्या घटनेपासून बुधवारपर्यंत तब्बल १९ घंटे तो बेपत्ता राहिला. चिमूर येथील ग्रामीण रूग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला नागपूरला हलविण्यात आले. विशेष म्हणजे काल सायंकाळी वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले. परंतु त्या ठिकाणी वाघ आढळून आला नाही. शिवाय त्याचे पदचिन्हही आढळून आले नाही.

त्यामुळे विकास जांभूळकर यांच्यावर वनविभागाला संशय निर्माण झाल्याने पत्नी मिना हिचेवर चिमूर येथील ग्रामीण रूग्णालयात पोर्स्टमार्टम होवूनही पुन्हा चंद्रपूर येथे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवून वनविभागाने रिपोर्स्टमार्टम करण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय प्रशासनाने चिमूर येथे मंगळवारी करण्यात आलेला पोर्स्टमार्टम कायम ठेवीत पुन्हा नव्याने पोर्स्टमार्टम करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नेल्यापाऊली मृतदेह परत चिमूरला वापस आणण्याची वेळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. त्यामुळे मंगळवारला घडलेल्या घटनेच्या वेळापासून बुधवारपर्यंत तब्बल ३६ तासांचा अवधी होवूनही त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकला नाही. सध्या मृतदेह चिमूर येथील रूग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

पतीच्या आढळून आलेल्या स्थितीवर संशय निर्माण झाल्याचे रिपोर्स्टमार्टमचा निर्णय : वनपरिक्षेत्राधिकारी धोंडणे 

मंगळवारी मिना जांभूळकर या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तर पती जंगलात बेपत्ता झाला होता. दिवसभर शोधकार्य राबवूनही त्याचा पत्ता लागलेला नव्हता. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घटनास्थळापासून पाचशे मिटर परिसरात पती विकास जांभूळकर जखमी अवस्थेत आढळून आला होता. मात्र दिवस व रात्रभर तो जंगलात कसा राहिला. यावर वनविभागाला संशय निर्माण झाला. तसेच वनाधिकाऱ्यांनही तसा पंचनामाही केला होता. प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अहवाल दिलेला होता. तरीही नव्याने पोर्स्टमार्टम करून खात्री करायची होती. त्यामुळे पुन्हा पोर्स्टमार्टम करण्याचा प्रयत्न झाल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी धोंडणे यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news