चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात शेजारील घरात आश्रयात गेलेल्या एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र, गोळीबारात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीला गोळी लागून ठार झाल्याची घटना रविवारी (दि.२४) रात्री साडेनऊच्या सुमारास् राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डात घडली. तर आश्रयास गेलेला लल्ली शेरवील हा गोळीबारात जखमी झाला आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव पूर्वशा सचिन डोहे असे आहे. ती राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डातील रहिवासी होती.