File photo
File photo

चंद्रपूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

Published on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रसिद्ध वाहतूकदार पप्पू उर्फ हरिकिसन मल्हन (58) याला मित्राच्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आज (दि.3) अटक केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मल्हन हा टायरचा व्यवसाय करणाऱ्या त्याच्या मित्राला दुकानात भेटण्यासाठी गुरुवारी (दि. 2) गेला होता. त्याच्या मित्राशी काही वेळ गप्पा मारल्यावर मल्हनने लघुशंका करायची आहे. असे सांगितले. यावेळी त्याच्या मित्राने त्याला दुकानाच्या वर असलेल्या स्वताच्या घरातील वॉशरूम वापरण्यास सांगितले.

मल्हन मित्राच्या  घरी लघुशंकेसाठी गेला. यावेळी मित्राची 12 वर्षांची मुलगी घरात एकटी होती. ही संधी साधून मल्हनने अश्लील कृत्य केले. हेच नाहीतर नंतर  मुलीला तिच्या पालकांना न सांगण्यासाठी बजावले. मात्र, तो गेल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. संतप्त पालकांनी बालिकेला रामनगर पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदविली.

पोलिसांनी मल्हनवर विनयभंग केल्या गुन्हा नोंद केला आहे. मल्हनला अटक करून पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली. पुढील तपास वरिष्ठ उपविभागीय पोलीस अधीकारी सुधाकर यादव करीत आहेत.

आरोपीच्या मित्रावरही गुन्हा दाखल

पप्पू मल्हानने मुलीचा विनयभंग केल्याचे कळताच त्याने धाव घेतली पण पप्पू निघून गेला होता.मित्राने बरेच कॉल केले पण त्याने कॉल घेतला नाही.संतप्त मित्राने पप्पूला गाठले आणि चोप दिला.या मारहाणीची तक्रार पप्पूने दिल्यावर त्या मित्रावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news