

Vehicle inspection in Deulgaon Raja area
देऊळगावराजा, पुढारी वृत्तसेवा : येथील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनियमितता रोखण्यासाठी आणि आदर्श आंचरसहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिका हद्दीत स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली. या पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून संवेदनशील भागांमध्ये सतत गस्त, वाहनांची तपासणी, संशयितांवर बारीक नजर आणि सर्व राजकीय घडामोडींवर थेट नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी विविध पथकांवर सोपविण्यात आली आहे. या पथकांच्या सततच्या टेहळणीमुळे कोणत्याही अनधिकृत हालचालीसाठी जागा राहिलेली नाही.
जालना रोडवर स्थिर सर्वेक्षण पथक प्रभावीरीत्या कार्यरत आहे. या पथकात पो. कॉ. भाऊसाहेब पवार, परमेश्वर मुंडे (पथक प्रमुख), आणिक अहेमद, फोटोग्राफर अक्षय गवई या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांवर आणि हालचालींवर विशेष लक्ष ठेवत आहे. जालना मार्गावरून देऊळगाव राजा शहरात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी, संवेदनशील ठिकाणी निगराणी, संशयास्पद हालचालींचे फोटोव्हिडिओ पुरावे गोळा करणे अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. चिखलीकडून येणारा रस्ता गणाची सतत गस्त करण्यात येत आहे. या पथकाकडून आलेल्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
कडक सर्वेक्षण
प्रशासनाने सुरक्षा आणि सर्वेक्षणाची कडक शिस्त लागू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्याला वेग आल्याने स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडिओ निरीक्षण पथके, तपासणी दस्ते आणि माहिती संकलन पथके यांची हालचाल शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.