

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार नाहीत, तर मानवाचे अवतार आहेत. अलिकडेच भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना रनौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असल्याचे म्हटले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. (Ramdas Athawale on PM Modi)
राज्यमंत्री आठवले आज (दि.८) केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी बुलढाणा दौ-यावर आले होते. सायंकाळी स्थानिक विश्राम भवनावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, मी मोदी यांना देवाचा अवतार मानत नाही, ते मानवाचा अवतार आहेत. पंतप्रधान मोदी हे जगातील प्रभावशाली नेते असून लोकप्रियतेच्या बाबतीत दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम ते मोडून काढतील, असा विश्वास मंत्री आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.