अंढेरा फाट्यावर अवैध वाळूच्या टिप्परची तहसीलदारांच्या कारला धडक

कारला धडक दिल्यानंतर चालक फरार
buldhana news
अंढेरा फाट्यावर अवैध वाळूच्या टिप्परची तहसीलदारांच्या कारला धडकfile photo
Published on
Updated on

Illegal sand-laden tipper rams into Tehsildar's car at Andhera Phata

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवाः अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल विभागाच्या पथकाच्या कारला वाळूने भरलेल्या टिप्परने धडक दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी अंढेरा फाट्याजवळ घडली. या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व्यांच्यासह पथकातील चौघे जण थोडक्यात बचावले. धडकेनंतर टिप्पर चालक वाहनासह पसार झाला असून, टिप्पर मालकानेही वाहन पळवून नेण्यास मदत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

buldhana news
Khamgaon-Jalna railway line: खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा 'पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन'मध्ये समावेश

अंढेरा व चिखली परिसरात अवैध वाळु वाहतुकीबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास अंढेरा फाट्याजवळ वाळुने भरलेला पांढऱ्या रंगाचा टिप्पर पथकाच्या निदर्शनास आला.

महसूल पथकाने टिप्पर थांबवून चालकाची चौकशी केली. पुढील कारवाईसाठी चालकाला टिप्पर पोलिस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने पोलिस ठाण्यात वाहन नेण्यास विरोध करत वाहन तेथून घेउन जाण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान टिप्पर मालक हर्षल अंभोरे याने चालकाला महसूल पथकाचे वाहन हटवून पुढे जाण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

buldhana news
Buldhana Crime | डिजीटल अरेस्ट भासवून २ कोटींची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

यानंतर टिप्पर चालकाने तहसीलदारांच्या पथकाची कार एमएच-४६-डी-५५) क्रमांकाला लक्ष्य करत तीव्र वेगाने टिप्पर वळविला. टिप्परची इनोव्हा कारला जोरदार धडक बसली. यावेळी वाहनात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, तलाठी आकाश खरात, पंजाब ताठे आणि वाहनचालक संतोष भोपळे होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

धडकेनंतर चालकाने टिप्पर घटनास्थळावरून पळवून नेला. महसूल पथकाने काही अंतर त्याचा पाठलाग केला; मात्र चालक टिप्परसह पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी टिप्पर मालक हर्षल अंभोरे आणि संबंधित चालकाविरुद्ध गुन्हात दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या टिप्पर चालकाचा तसेच वाहनाचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

गौरवानंतर धक्कादायक प्रसंग

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या महसूल विभागातील कार्याची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. या गौरवानंतर काही दिवसांतच अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करताना त्यांच्या पथकाला धोकादायक प्रसंगाला सामोरे जावे लागल्याने महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news