Gutkha Seized : साखरखेर्डा येथे १८ लाखांचा गुटखा जप्त

अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई
Gutkha Seized
Gutkha Seized : साखरखेर्डा येथे १८ लाखांचा गुटखा जप्तfile photo
Published on
Updated on

Gutkha worth ₹18 lakh seized at Sakharkherda

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अवैध गुटखा विक्री व साठवणुकीविरोधात साखरखेर्डा पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या मदतीने मोठी कारवाई करत तब्बल १८ लाख २१ हजार ९२१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.

Gutkha Seized
Gutkha Seized : बदनापूर हद्दीत १२ लाख ६६ हजारांचा गुटखा पकडला

जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी साखरखेर्डा येथील संशयित ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवलेला आढळून आला.

कारवाईदरम्यान शेख इम्रान शेख चांद व शेख मुस्ताक शेख (दोघे रा. साखरखेर्डा खलील) हे पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून १८.२१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसानी सांगितले.

Gutkha Seized
Purna Police Raid | पूर्णेत पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा; ७ बैलांसह ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पीएसआय प्रताप बाजड, एचसी गजानन दराडे, शरद गिरी, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, पोलिस कॉन्स्टेबल मनोज खरडे, एलसीबीचे राजू आडवे, तसेच एपीआय करेवाड व अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपाळे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news