Illegal drugs seizure : धरणकमान परिसरात 5.50 किलो गांजा जप्त; अल्पवयीन ताब्यात

1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Illegal drugs seizure
देऊळगाव राजा ः पोलिसानी जप्त केलेला गांजा. pudhari photo
Published on
Updated on

देऊळगाव राजा ः तालुक्यातील टाकरखेड भागिले जवळील धरणकमान परिसरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 5 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक संशयित व्यक्ती गांजा विक्रीसाठी ट्रॅव्हल्सने धरणकमान परिसरात येणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी खाडे यांच्या श्री गजानन हॉटेलसमोर सापळा रचला. संशयित व्यक्ती आढळताच त्याची तपासणी करण्यात आली.

Illegal drugs seizure
Chandrapur Drugs Seized | रहमतनगर परिसरात गांजाविरोधी कारवाई; ८ किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त

तपासणीदरम्यान त्याच्या जवळील बॅगेतून 5 किलो 50 ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे 1,01,000 रुपये) तसेच विक्रीसाठी वापरला जाणारा मोबाईल (10,000 रुपये) असा एकूण 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Illegal drugs seizure
Raigad crime news | शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.तपास करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news