Raigad crime news | शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Illegal beef transport Maharashtra | प्राथमिक तपासात संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे
Raigad crime news
Raigad crime news
Published on
Updated on

महाड : महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरात गोवंशीय मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ६५ किलो मांस व एक चारचाकी वाहन जप्त केले असून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई १५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३२५, ३ (५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जफर अब्दुल मज्जीद गिते (रा. जुई बु, महाड) आणि शहेबाज अब्दुल्ला मुंडे (रा. जुई, महाड) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. संशयितांकडून सुमारे १६ हजार २५० रुपये किंमतीचे अंदाजे ६५ किलो गोवंशीय मांस तसेच सुमारे एक लाख रुपये किंमतीचे महिंद्रा जितो कंपनीचे वाहन (क्रमांक MH 06 BU 1766) असा एकूण १ लाख १६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली असून प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत. हिंदूंच्या पवित्र महाशिवरात्रीचा दिवशीच घडलेल्या या संवेदनशील स्वरूपाच्या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिस कारवाईची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गोरक्षक शिरगाव चेकपोस्ट नाक्यावर जमा झाले होते; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news