VBA protest : प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेचा निषेध

वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
VBA workers demonstration
जालना ः अंबड चौफुलीवर प्रतिमेचे दहन करताना वंचितचे कार्यकर्ते.pudhari photo
Published on
Updated on

जालना : माजी खासदार अमर साबळे यांनी वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दि. 9 रोजी अंबड चौफुली येथे आंदोलन केले.

यावेळी वंचित बहूजन आघाडीच्या उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत साबळे यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक होळी करून निषेध नोंदवण्यात आला. एप्स्टीन फाईलच्या संदर्भात मुंबईत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनावर साबळे यांनी टीका केल्याने राज्यभर कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

VBA workers demonstration
Weather update Jalna : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला; नागरिक हैराण

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च रोजी मुंबई येथे मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन करत प्रश्न उपस्थित केले होते. मोदींना विचारलेल्या प्रश्नामुळे अमर साबळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केले. याचा निषेध सोमवार रोजी नोंदवण्यात आला.

यावेळी वंचित बहूजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके, अकबर इनामदार, राजेंद्र खारत, भानुदास साळवे, रमाबाई होरशील, सुरज सोनवणे, संजय आदमाने, विलास नरवडे, सुशीला गायकवाड, लिलाताई काकडे, अमोल लोखंडे, सत्यपाल गायकवाड, बुध्दाजी भोसले, कपिल सूर्यनारायण, शत्रूधन कोळी, दिलीप मगर, दत्ता आदमाने, पांडुरंग मगर आदी उपस्थित हेोते.

VBA workers demonstration
livestock attack : अज्ञात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात रेडकूचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news