Tiger Ranveer Dnyanganga| 'तीन अभयारण्यांची भ्रमंती, ४९८ किलोमीटरचा प्रवास; 'रणवीर' ज्ञानगंगेत स्थिरावला'

टिपेश्वर, गौताळा आणि ज्ञानगंगा अशा तीन अभयारण्यांतून भ्रमंती केल्यानंतर त्याने स्वतःहून ज्ञानगंगेचा अधिवास निवडला
Tiger Ranveer Journey 498 Km
Tiger Ranveer Journey 498 KmPudhari
Published on: 
Updated on: 

Tiger Ranveer Journey 498 Km

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात आणखी एका वाघाचे नैसर्गिकरीत्या आगमन झाले आहे. 'रणवीर' असे नामकरण करण्यात आलेला हा नर वाघ तब्बल ४९८ किलोमीटरचा प्रवास करून अखेर ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. टिपेश्वर, गौताळा आणि ज्ञानगंगा अशा तीन अभयारण्यांतून भ्रमंती केल्यानंतर त्याने स्वतःहून ज्ञानगंगेचा अधिवास निवडला आहे. त्यामुळे अभयारण्याच्या वनवैभवात आणखी भर पडली आहे.

'रणवीर'चे मूळ नाव T3-C1 असे आहे. त्याने यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यापासून प्रवास सुरू केला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य आणि तेथून बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्य असा त्याचा प्रवास झाला. विविध वनक्षेत्रांतून भ्रमंती केल्यानंतर त्याने ज्ञानगंगा अभयारण्याला आपला नवा अधिवास म्हणून पसंती दिली आहे.

Tiger Ranveer Journey 498 Km
Buldhana News | महसूलमंत्री बावनकुळे यांची अंधाऱ्या रात्री मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळी शेतशिवाराची पाहणी!

यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये PKT7-CP1 या नर वाघाला 'धुरंधर' नावाने, तर जुलै २०२६ मध्ये T163-FS1F या मादी वाघिणीला 'मोना' नावाने ज्ञानगंगा अभयारण्यात मुक्त करण्यात आले होते. आता नोव्हेंबरमध्ये 'रणवीर'च्या आगमनामुळे या अभयारण्यात तीन वाघांचा अधिवास निर्माण झाला आहे. या घडामोडीमुळे परिसरातील व्याघ्र अधिवास आणि जैवविविधतेच्या दृष्टीने सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.

२०५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव संरक्षण आणि अधिवास विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अवैध चराईवर नियंत्रण, पाणवठ्यांची निर्मिती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि वन्यजीवांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. देव्हारी गावाच्या यशस्वी पुनर्वसनामुळे अभयारण्य क्षेत्रात विस्तार होऊन वन्यजीवांना अधिक सुरक्षित आणि शांततापूर्ण अधिवास उपलब्ध झाला आहे.

Tiger Ranveer Journey 498 Km
Buldhana news: समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून ३० टन कांद्याचा ट्रक पळवला; चौघांना अटक

दाट वनराई, विविध वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती, मोठे जलाशय आणि आता तीन वाघांची उपस्थिती यामुळे ज्ञानगंगा अभयारण्याचे आकर्षण वाढले आहे. 'रणवीर'च्या आगमनामुळे हे अभयारण्य वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आणखी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.