Buldhana Accident| समृद्धी महामार्गावर कंटेनरची १५ कारना धडक; १० ते १५ प्रवासी जखमी

सुदैवाने जीवितहानी नाही, एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या अपघातांची घटना
Buldhana Accident News
Buldhana Accident News
Published on: 
Updated on: 

बुलढाणा: सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील तढेगाव फाट्याजवळ शुक्रवार (दि.१३) सकाळी एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या अपघातांची घटना घडल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. कंटेनर आणि सिमेंट मिक्सरच्या अपघातानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने रस्त्यावर उभ्या असलेल्या १५ कारला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

Buldhana Accident News
Mumbai Fire Accident : मालवणीत फटाक्यांच्या दुकानाला आग; १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सहाच्या सुमारास तढेगाव फाट्याजवळ कंटेनर आणि सिमेंट मिक्सर यांच्यात अपघात झाला. या धडकेत सिमेंट मिक्सर महामार्गावर पलटी झाल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला. अपघातग्रस्त वाहनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक वाहने घटनास्थळाजवळ थांबली होती.

दरम्यान, सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने रस्त्यावर थांबलेल्या १५ ते १६ कारला जोरदार धडक दिली. एकापाठोपाठ अनेक वाहनांना धडक बसल्याने घटनास्थळी वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. दिवाळीच्या सणानिमित्त कुटुंबासह प्रवास करणाऱ्या वाहनांमध्ये महिला, वृद्ध नागरिक आणि इतर प्रवासी असल्याने घटनेचे गांभीर्य अधिक वाढले.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करून बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी जालना तसेच छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांकडे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, किनगाव राजा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार भारत चापाईतकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्गाचे सुरक्षा कर्मचारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न केले.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका; वेगाला लगाम घालणार कोण?

समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गावर सुसाट वेगाने धावणारी वाहने, अवजड वाहनांचा वेग आणि वाहनांमधील सुरक्षित अंतराचा अभाव यामुळे मोठ्या दुर्घटनांना निमंत्रण मिळत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. एखादा अपघात घडल्यानंतर त्याठिकाणी वाहने थांबतात आणि त्याच ठिकाणी पुन्हा दुसरा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. तढेगाव फाट्याजवळ घडलेली घटना याचेच गंभीर उदाहरण ठरली आहे.

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेची कठोर अंमलबजावणी, अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण, वाहनचालकांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याबाबत जनजागृती आणि अपघातस्थळी तातडीने वाहतूक व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Buldhana Accident News
Chandrapur Accident | मध्यप्रदेशात देवदर्शनाला जाताना कारची कंटेनरला धडक; वरोऱ्यातील वकिलासह दोघांचा मृत्यू , २ जण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.