Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर खासगी बसची ट्रकला धडक; २७ प्रवासी जखमी

नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २७८.८०० जवळ अपघात झाला
Buldhana Bus Truck Collision
Buldhana Bus Truck CollisionPudhari
Published on
Updated on

Buldhana Bus Truck Collision

बुलढाणा, : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ सोमवारी (दि.८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात खासगी बसने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २७ प्रवासी जखमी झाले. यापैकी १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे ४.१५ वाजता नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २७८.८०० जवळ हा अपघात घडला. एमएच-३१ एफसी-७४६८ क्रमांकाची खासगी बस पुण्यावरून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने समोर चालत असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून निघून गेला.

Buldhana Bus Truck Collision
Buldhana weather : अंढेरा परिसराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा

घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र फर्दापूर आणि मेहकर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे आणि डॉ. गुणवंत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वप्नील सुसर, डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शाह, डॉ. आदिल खान आणि डॉ. गणेश शेळके यांच्या पथकाने जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात हलविले.

Buldhana Bus Truck Collision
Buldhana Rain damage |संग्रामपूर व जळगांव जामोद तालुक्यात वादळी पावसामुळे केळी, संत्रा बागांना फटका

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये नागपूर, पुणे, खापरखेडा, बुलढाणा, बीड, चंद्रपूर आणि अहिल्यानगर येथील प्रवाशांचा समावेश आहे. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश असून सर्वांची नावे पोलिसांनी नोंदविली आहेत.

या अपघाताचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news