Buldhana News | डीएचओ मानांकनात बुलढाणा जिल्हा राज्यात तृतीय

अमरावती परिमंडळात जिल्ह्याला द्वितीय स्थान
Health Department
Health DepartmentFile Photo
Published on
Updated on

Maharashtra DHO ranking 2026

बुलढाणा : राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांकांवर आधारित डिसेंबर 2025 अखेरच्या आरोग्य निर्देशांक मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच अमरावती परिमंडळात जिल्ह्याला द्वितीय स्थान मिळाले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्हा राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये राहिला. माता व बालक आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, विविध लसीकरण मोहिमा, आरसीएच ऑनलाईन पोर्टलवरील नोंदणी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम तसेच आयुष्मान भारत अंतर्गत मोफत तपासण्या यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी हे यशाचे प्रमुख घटक ठरले.

Health Department
NQAS certification Buldhana | बुलढाणा जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन’ मानांकन

जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे,६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, २८० आरोग्य उपकेंद्रे, १० आपला दवाखाना केंद्रे आणि ४० नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांच्या मार्फत आरोग्य सेवा पुरविली जाते. सुरक्षित प्रसुती, प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर तपासणी,राष्ट्रीय कुटुंब नियोजन अभियान, तसेच आपत्कालीन परिस्थितीत '१०८ रुग्णवाहिका' सेवा उपलब्ध करून देण्यात येते. प्रधानमंत्री सुरक्षित मातृवंदन अभियानाचीही प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे सांगण्यात आले.

राज्यस्तरीय गुणवत्ता सुची. राज्यस्तरीय गुणवत्ता सुचीनुसार,६०.९२ गुणांसह नागपूर जिल्हा प्रथम,५९.८९ गुणांसह अकोला जिल्हा द्वितीय,५९.५८ गुणांसह बुलढाणा जिल्हा तृतीय तर ५९.३८ गुणांसह धाराशिव जिल्हा चतुर्थ आणि ५८.६१ गुणांसह सांगली जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.अमरावती परिमंडळात अकोला जिल्हा प्रथम तर बुलढाणा जिल्हा द्वितीय क्रमांकावर आहे.

Health Department
Buldhana News | आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी दोन दिवसांच्या अंतराने संपवले जीवन, बुलढाण्यात खळबळ

रिक्त पदांची मोठी संख्या असूनही नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण कामामुळे यश साध्य झाल्याचे जि.प.चे सिईओ गुलाबराव खरात यांनी सांगितले. मानांकन प्रक्रियेत डॉ. मिलिंद जाधव, डॉ. रणजीत मंडाले, डॉ. हरी पवार, डॉ. वर्षा गुट्टे, श्रीमती शीतल साखळीकर, अमर राठोड आदींनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news