Buldhana Crime News | गुन्हेगारांवर कारवायांचा वचक : बुलडाणा जिल्ह्यातील गुन्हेगारीत घट

Buldhana SP | पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांचा दावा
Buldhana  Crime Rate Decrease
Buldhana SP Pudhari
Published on
Updated on

Buldhana Crime Rate Decrease

बुलढाणा : जिल्हा पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर कारवायांचा वचक बसवल्यामुळे वर्ष २०२४च्या तुलनेत जिल्ह्यातील गुन्हेगारीत १० टक्के घट झाली आहे. तर दाखल गुन्ह्यांपैकी ८० टक्के गुन्ह्यांची उकल झाली आहे, असा दावा पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलिस प्रशासनाच्या गतवर्षातील कामगिरीचा विस्तृत लेखाजोखाच यावेळी मांडला.

तांबे यांनी सांगितले की, गतवर्षात खुनाच्या ५६ पैकी ५५ गुन्ह्यांची तर दरोड्याच्या सर्व सातही गुन्ह्यांची उकल करून २ कोटी ७७ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जबरी चोरीच्या ४९ गुन्ह्यात १४ लाख ५६ हजारांचा तर घरफोडीच्या ६२ गुन्ह्यात ३१ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. चोरींच्या ३८७ गुन्ह्यांची उकल करून १० कोटी ४३ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Buldhana  Crime Rate Decrease
Buldhana Superintendent of Police | बुलढाणा पोलीस दलात अभूतपूर्व पेचप्रसंग: खुर्ची एक 'SP' दोन; विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष

'मिशन परिवर्तन 'अंतर्गत गांजा,एम.डी.ड्रग्ज आदी संबंधी १०३ कारवायात ११८ आरोपींना अटक करून एकूण १३ कोटी ६५ लाख२८ हजारांचा मुद्देमाल करण्यात आला आहे. तसेच १ कोटी ६० लाखांचे ८०० किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

अवैध गौनखनिज चोरीच्या १३३ कारवायांत १३ कोटी १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात चार आरोपींवर एमपीडीएची कारवाई तर ६ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. प्रतिबंधित गुटख्यासंबंधी ५४ कारवाया करून ७ कोटी ५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Buldhana  Crime Rate Decrease
Ballari SP Suspended : बळ्ळारीचे पोलिस अधीक्षक नेज्जूर निलंबित, 'हे' प्रकरण भोवले

जिल्ह्यात अपहरणाच्या १६३ प्रकरणात १२६ मुली व ३४ मुलांची यशस्वी सुटका करण्यात आली. हरवलेल्या १४७० व्यक्तींपैकी १०२४ व्यक्तींना शोधून काढण्यात आले. जिल्ह्यात आर्थिक गुन्ह्यांच्या ८ प्रकरणात ३९ आरोपींना अटक करून ७१लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सायबर गुन्ह्यांत फसवणूक झालेल्या १८ तक्रारदारांना त्यांचे २४ लाख ६९ हजार ३३६ रू.परत मिळवून देण्यात आले.

आर्म अॅक्टनुसार केलेल्या ४४ कारवायांत १५ पिस्टल, २४ मैग्झीन, ४२ काडतूस,२ शाटगन, २ बारा बोर रायफल, २ एअर रायफल, ९१ तलवारी, ७ चाकू, ८ कोयते व ७ लोखंडी सुरेश अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. विविध प्रतिबंधात्मक कारवाया करून गुन्हेगारांवर पोलिस प्रशासनाने वचक निर्माण केला.

Buldhana  Crime Rate Decrease
Buldhana Crime | बुलढाणा: जानेफळ खून प्रकरणातील फरार आरोपी संभाजीनगर येथून जेरबंद

न्यायालयात दाखल एकूण ३५४६प्रकरणांत दोष सिध्द आरोपीस शिक्षा व दंड झाला.अशी माहिती पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली.यावेळी अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक आदित्यकुमार सिंह उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news