Buldhana Murder Case: पोलीस ठाण्याजवळच 25 वर्षीय तरुणावर सपासप वार, किरकोळ वादाला रक्तरंजित वळण

मारेकऱ्यांत दोन अल्पवयीन, परिसरात भीतीचे वातावरण
Buldhana Murder Case
Buldhana Murder Case : अंढेरामध्ये २५ वर्षीय तरुणाची निघृण हत्या, तिघे ताब्यात File Photo
Published on
Updated on

Brutal murder of 25-year-old youth in Andhera, three arrested

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : अंढेरा बाजारगल्लीत शनिवार (दि. २५) रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान किरकोळ वादातून तिघा जणांनी २५ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याची निघृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही घटना अंढेरा पोलिस ठाण्यापासून केवळ काही अंतरावरच घडल्याने "कायद्याचा धाक संपत चाललाय का?" असा प्रश्न जनतेतून व्यक्त केला जात आहे.

Buldhana Murder Case
Harshwardhan Sapkal : सत्ताधारी २१ आमदारांना ठेकेदाराकडून महागड्या कारचे गिफ्ट

मृत तरुण आकाश उत्तम चव्हाण हा चिखली तालुक्यातील आसोला गावचा रहिवासी असून, आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त अंढेराला आला होता. किरकोळ कारणावरून झालेला वाद क्षणातच रक्तरंजित स्वरूपात बदलला आणि धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एपीआय रुपेश शक्करगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह अचलपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी संतोष खाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

Buldhana Murder Case
Bachchu Kadu Controversy Statement : छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे, तर खुद्द त्यांच्या सासऱ्यांनीच मारले

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे, त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. रविवार (दि. २६) रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

मृतकाच्या हत्येची वार्ता समजताच आसोला गावातील नागरिक मोठ्या संख्येने अंढेरा पोलिस ठाण्यात जमले. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मेहकर येथील दंगा काबू पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अंढेरा ठाण्याला छावणीचे स्वरूप देण्यात आले असून पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news