

Administration Keeps a Watch on Gas Hoarding; Inspection Drive Underway
लोणार, पुढारी वृत्तसेवा लोणार तालुक्यात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गॅस साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भूषण पाटील यांनी दिली.
प्रसिध्दी पत्रकात तहसीलदार भूषण पाटील यांनी म्हटले आहे की, या तपासणी मोहिमेमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी आरती दांडगे, पुरवठा महसूल सहायक दीपाली गुडघे, अजित गायकवाड, कोतवाल प्रवीण मापारी हे सर्व गॅस एजन्सीधारक, पेट्रोल पंप चालक, हॉटेल, उपहारगृह, ढाबा मालकांना निर्देश देत आहेत.
घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करू नये, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इश ाराही प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाला सहकार्य करावे, असेही तहसीलदार तसेच पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.