Bhandara Tiger Captured | ‘त्रिशूल’ वाघ जेरबंद: भंडारा वनविभागाची रावणवाडी जंगलात यशस्वी मोहीम

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर परिसरात शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करून दहशत
Rawanwadi Forest Trishul Tiger Captured
Rawanwadi Forest Trishul Tiger CapturedPudhari
Published on: 
Updated on: 

Rawanwadi Forest Trishul Tiger Captured


भंडारा : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर परिसरात शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या ‘त्रिशूल’ नावाच्या पट्टेदार वाघाला शनिवारी ( दि. २१ ) सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी जंगल परिसरात जेरबंद करण्यात आले. भंडारा वनविभागाने नियोजनबद्धरीत्या राबविलेल्या मोहिमेला यश आल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कपाळावरील त्रिशूलसदृश आकारामुळे स्थानिकांनी या वाघाला ‘त्रिशूल’ असे नाव दिले आहे. वनविभागाच्या अधिकृत नोंदीनुसार त्याचा क्रमांक टीएटीआर १८९ असा आहे. या वाघाचा जन्म २०२०-२०२१ च्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात झाला असावा, असा अंदाज आहे.

Rawanwadi Forest Trishul Tiger Captured
Bhandara ST Depot News | रात्रीच्या अंधारात मुलींना रस्त्यावर सोडले; भंडारा आगारातील दोन एसटी कर्मचारी निलंबित

‘त्रिशूल’चा मुख्य वावर ब्रह्मपुरी वनविभाग, चिमूर वनपरिक्षेत्रातील गडेगाव बीट तसेच उरकुडपार-गरडापार जंगल परिसरात होता. वनविभागाच्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत या वाघाने तीन शेतकºयांवर प्राणघातक हल्ले केले होते. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर भंडारा वनविभागाने रावणवाडी जंगल परिसरात राबविलेल्या नियोजनबद्ध मोहिमेत या वाघाला जेरबंद करण्यात यश मिळविले. त्यामुळे संभाव्य मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.