

भंडारामधील सिहोरा येथील तरुणाने ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने. एटीएम फोडले असल्याची घटना उघडकीस आली. गेममध्ये १ लाख ३० हजार रुपये गमावल्यानंतर तरुणाने एटीएम फोडले. तरुणाला एटीएममधून पैसे चोरून आपले नुकसान भरून काढायचे होते. मात्र सिहोरा पोलिसांनी त्याला २४ तासांत पकडले. दिनेश सुरेश सोनकुसरे (१९, रा. सिहोरा) असे आरोपीचे नाव आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे शनिवारी (दि.१०) बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी तपास सुरू केला. एटीएम मशिन रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये एक तरुण चोरी करताना आढळून आला. पोलिसांनी दिनेशकडे चौकशी करून चोरीचे कारण विचारले. त्यानंतर दिनेशने ऑनलाइन गेमिंगमध्ये 1 लाख 30 हजार रुपये गमावल्याचे सांगितले.
या नंतर कुटुंबीय त्याला बँकेत जमा केलेल्या पैशांबाबत विचारणा करत होते. अशा स्थितीत त्याने एटीएम मशीन लुटण्याचा कट रचला. सिहोरा येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडली. एटीएम मशिनबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी चतुराईने टाळले. मात्र आतमध्ये पोहोचल्यावर एटीएम मशीन फोडताना तोंडाला बांधलेला स्कार्फ समोर आला. त्यामुळे एटीएम मशिनवर लावलेल्या कॅमेऱ्यात तो कैद झाला. त्याच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश सुरेश सोनकुसरे (वय.१९) हा होतकरू विद्यार्थी आहे. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. आता तो पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी प्रवेश घेत होता. दरम्यान, ऑनलाइन गेममध्ये अडकून त्याने पैसे गमावले. त्यानंतर पैसे मिळवण्यासाठी त्याने गुन्हेगारी कृत्य केले.