Bhandara Rest House | भंडारा विश्रामगृहात शॉर्टसर्किट; खासदार पडोळे थोडक्यात बचावले

पीडब्ल्यूडीच्या निकृष्ट कामाचा फटका, कार्यकारी अभियंत्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष
Bhandara Rest House Short circuit
Bhandara Rest House Short circuitPudhari
Published on
Updated on

Bhandara Rest House Short circuit

भंडारा : जिल्हा मुख्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका थेट लोकप्रतिनिधींना बसला असून, विश्रामगृहात झालेल्या शॉर्टसर्किटच्या घटनेत खासदार थोडक्यात बचावले आहेत. आज बुधवारी (दि.२६)  रोजी घडलेल्या या प्रकारामुळे शासकीय विश्रामगृहातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

खासदार पडोळे हे गुरुवारी (दि.२६) शहरातील इंधन पुरवठा सुव्यवस्थेचे सर्वेक्षण करून शासकीय विश्रामगृहात विसाव्यासाठी थांबले होते. याच दरम्यान, त्यांनी थांबलेल्या कक्षातील एसीच्या वायरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. परिसरात धूर आणि ठिणग्या दिसताच खासदार आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तातडीने कक्षाबाहेर धाव घेतली. सुदैवाने, प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी, या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Bhandara Rest House Short circuit
Bhandara News | बोगस दिव्यांग प्रमाणपत्र भोवले; तीन अधिकारी बडतर्फ, तीन कर्मचारी निलंबित

विश्रामगृहातील कामांचा दर्जा आणि सुरक्षेबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता आणि संबंधित विभागाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता कुचेवार यांच्याकडे विचारणाही केली होती. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई न होता केवळ कागदी घोडे नाचवले गेल्याचे चित्र आहे.

खासदारांचा आक्रमक पवित्रा 

या जीवघेण्या अनुभवानंतर खासदार पडोळे यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्तव्यात कसूर, कामाचा निकृष्ट दर्जा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठराखण या विरोधात त्यांनी शासन स्तरावर तक्रार दाखल केली आहे. संबंधित अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या हकालपट्टीची मागणी त्यांनी केली असून, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही दिला आहे.

Bhandara Rest House Short circuit
Bhandara Crime | पत्नीची छेड काढल्याच्या रागातून पतीने उचलले टोकाचे पाऊल

जिल्हा विश्रामगृहात मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांचे सतत येणे-जाणे असते. अशा संवेदनशील ठिकाणी विद्युत उपकरणांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष हे विभागाच्या भोंगळ कारभाराचे लक्षण मानले जात आहे. या घटनेनंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग दोषींवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news