Nepal flood : नेपाळच्या महाप्रलयामध्ये साकोलीचे ट्रेकर अतुल झोडे सुखरूप!

महाप्रलयानंतर साधला संपर्क, कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला मिळाला दिलासा, ट्रेकिंगसाठी गेले होते नेपाळला
Nepal flood
Nepal flood : नेपाळच्या महाप्रलयामध्ये साकोलीचे ट्रेकर अतुल झोडे सुखरूप!
Published on
Updated on

भंडारा: साकोली येथील रहिवासी डॉ. रवींद्र झोडे यांचे पुत्र तथा ट्रेकर अतुल झोडे हे नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी गेले असून, नेपाळमध्ये निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीनंतर ते सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

अतुल यांचा कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क होत असून, ते सुरक्षित असल्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला मोठा दिलासा मिळाला आहे. अतुल झोडे हे नेपाळमधील सुमारे ४ हजार १३० मीटर उंचीवरील अन्नपूर्णा बेस कॅम्पवर ट्रेकिंगसाठी गेले आहेत. ते चार ते पाच दिवसांपूर्वी नेपाळला रवाना झाले होते.

Nepal flood
Nepal Tibet border flood threat : नेपाळ-तिबेट सीमेवर ७२ तासांत आणखी एक तलाव फूटण्याची शक्यता : चीनने दिला इशारा

नेपाळमध्ये महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबियांना चिंता निर्माण झाली होती. मात्र, कालपासून अतुल यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला असून, त्यांनी आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. गुरुवारी सकाळीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाल्याची माहिती त्यांचे वडील डॉ. रवींद्र झोडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news