Bhandara Tiger Attack | लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार

बासोरा-वेलतूर कालवा मार्गावरील घटना
Tiger spotting Pevtha Bhandara
Tiger AttackPudhari
Published on: 
Updated on: 

Umred Karhandla Wildlife Sanctuary

भंडारा : उमरेड- कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या बासोरा-बोरगाव-वेलतूर कालवा मार्गावर वाघाच्या हल्ल्यात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अमित भीमराव राऊत असे मृत युवकाचे नाव असून, तो बासोरा येथील रहिवासी होता. अवघ्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. या घटनेमुळे बासोरा आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित राऊत हा अन्य चार मजुरांसह वेलतूर येथे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम करण्यासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर पाचही जण दोन दुचाकींवरून गावाकडे परतत होते. सोमवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास ते गरडा-बासोरा कालवा मार्गावरून जात असताना त्यांना रस्त्यावर अचानक दोन वाघ दिसले. अचानक वाघ दिसल्याने मजुरांमध्ये भीती संचारली.

Tiger spotting Pevtha Bhandara
Bhandara Accident | नागपूर-रायपूर महामार्गावर ट्रकची पोलिस व्हॅनला धडक; हवालदाराचा मृत्यू

घाईगडबडीत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी वाहने सोडून सुरक्षित ठिकाणी पळण्याचा प्रयत्न केला. याचवेळी अमितचा पाय घसरल्याने तो खाली पडला. जीव वाचविण्यासाठी त्याने जवळच्या झुडपांत आणि वनविभागाच्या नालीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी वाघाने त्याच्यावर झडप घातली. वाघाने त्याच्या मानेवर हल्ला केल्याने अमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले अन्य चार मजूर या हल्ल्यातून बचावले.

घटनेची माहिती गावात पोहोचल्यानंतर बासोरा आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ४०० ते ५०० नागरिक घटनास्थळी जमा झाले. माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Tiger spotting Pevtha Bhandara
Bhandara Fraud | गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवून तरुणाची २५ लाखांची फसवणूक

गरडा-बासोरा कालवा मार्गावरील सुमारे दीड किलोमीटरचा पट्टा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. परिसर उमरेड-कºहांडला अभयारण्याच्या बफर क्षेत्रालगत असून, येथे वाघांची नियमित वर्दळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या संवेदनशील पट्टयात सौरदिवे, वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत सावधानतेचे फलक आणि नियमित गस्त सुरू करण्याची गरज आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसाठी विशेष खबरदारीच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. मृत अमित राऊतच्या कुटुंबाला शासन आणि वनविभागाकडून तातडीने आर्थिक मदत व नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news