Bhandara Fraud | गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवून तरुणाची २५ लाखांची फसवणूक

भंडारा येथील नेहरू वॉर्डातील घटना
Fraud Case
Fraud Case File Photo
Published on: 
Updated on: 

Bhandara Youth Duped 25 Lakhs

भंडारा: गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भंडारा येथील नेहरू वॉर्डचे रहिवासी प्रेमलाल दोडकू टेंभुरकर (७०) यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले.

आरोपींमध्ये भंडारा येथील खात रोड म्हाडा कॉलनीतील रहिवासी अभिषेक पुरुषोत्तम बांते (वय ३७), पुरुषोत्तम बांते (वय ६१) आणि ओषिण गांधी (वय ३०) यांचा समावेश आहे. आरोपींनी तक्रारदार, प्रेमलाल टेंभुरकर यांचा मुलगा मयूर टेंभुरकर याला गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवले. त्याच्याकडून वेळोवेळी २५ लाख ६ हजार ८४६ रुपये उकळले.

Fraud Case
Bhandara Tinku Khan Case | टिंकू खान हत्याकांडातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी

परंतु, त्यांनी हॉटेल उघडून दिले नाही. जेव्हा आरोपींकडे पैशांची मागणी केली, तेव्हा औषिण गांधी याने मयुरला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता, २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास मोहरकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news